Prithvi Shaw Hit 64 Runs Out Of 66 Opening Partnership With Yashasvi Jaiswal
Prithvi Shaw Hit 64 Runs Out Of 66 Opening Partnership With Yashasvi Jaiswal  esakal
क्रीडा

Ranji Trophy : पृथ्वीचा पार्टनर जैसवालचा कहर; 54 चेंडूतही उघडले नाही खाते

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफीची उपांत्य फेरी सुरू आहे. बुंगळुरूमध्ये मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात सामना होत आहे. पहिल्या डावात 393 धावा करून मुंबईने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचा संघ पहिल्या डावात 180 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात यशस्वी जैसवालने 272 चेंडूत शतकी खेळी करत संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले होते. मात्र हाच यशस्वी जैसवाल दुसऱ्या डावात मात्र कासवाच्या गतीला लाजवेल अशा गतीने फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीला सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने मुंबईच्या 66 धावांच्या सालमीमधील 64 धावा एकट्यानेच केल्या होत्या. त्यामुळे पृथ्वी शॉ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. (Prithvi Shaw Hit 64 Runs Out Of 66 Opening Partnership With Yashasvi Jaiswal)

मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या होत्या त्यात सलामीवीर यशस्वी जैसवालने शतकी योगदान दिले. त्यानंतर तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत उत्तर प्रदेशचा पहिला डाव 180 धावात गुंडाळला. 213 धावांची मोठी आघाडी घेतलेल्या मुंबईने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव खेळण्यास सुरूवात केली. मात्र यादरम्यान, एक अजब प्रकार घडला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैसवालला तब्बल 53 चेंडू खेळून देखील आपले खाते उघडता आले नव्हते.

जैसवालच्या या कासवापेक्षा संथ गतीच्या खेळीमुळे एक अनोखा विक्रम प्रस्थापित झाला. यापूर्वी 1888 मध्ये ऑस्ट्रेलियन विरूद्ध नॉर्थ सामन्यात ऑल्ड ट्राफोर्डवर पी. एस. मॅकडोनेल यांनी 86 धावांच्या भागीदारीमधील 82 धावा केल्या होत्या. तर ए.सी. बॅनरमन यांनी 4 धावा केल्या होत्या. या भागीदारीत मॅकडोनेल यांचा वाट 95.35 इतका होता. तर आजच्या रणजी ट्रॉफीच्या मुंबई विरूद्ध उत्तर प्रदेश सेमी फायनलमध्ये पृथ्वी शॉचा वाटा 96.97 इतका होता. त्याने भागीदारीतील 66 पैकी 64 धावा एकट्याने केल्या होत्या. तर यशस्वी जैसवालला 66 पैकी एकही धाव करता आली नव्हती.

दुसऱ्या बाजूने कर्णधार पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करत 66 धावांची सलामी दिली. यात शॉच्या 64 धावांचे योगदान होते. अखेर 71 चेंडूत 64 धावा करणारा पृथ्वी शॉ बाद झाला. तरी देखील यशस्वी जैसवालला आपले खाते उघडता आले नव्हते. शॉ बाद झाल्यानंतर आलेल्या अमन जाफरने देखील आपले खाते उघडले. अखेर 22 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत यशस्वी जैसवालने आपले खाते उघडले. जैसवालचा 54 वा चेंडू होता. यानंतर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. जैसवालने देखील आपल्या खेळीचा वेग वाढवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT