Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara Sakal
क्रीडा

Pujara 100th Test : शाहरूखने मदत केली नसती तर, 14 वर्षांपूर्वी संपलं असतं चेतेश्वरचं करिअर

सकाळ डिजिटल टीम

Pujara 100th Test : भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा उद्यापासून त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी हा त्याचा 100 वा सामना असेल. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने 1-0 ने आघाडीवर आहे.

100 कसोटी खेळणारा पुजारा भारताचा 13वा खेळाडू ठरणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पुजाराच्या वडील अरविंद पुजारा यांनी एका मुलाखतीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानबद्दल मोठा खुलासा केला आहे.

2009 मध्ये शाहरुखने आपल्या मुलाला कशाप्रकारे मदत केली होती याबाबत पुजाराच्या वडिलांनी भाष्य केले आहे.

पुजारा कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळत असताना 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. कोलकाताकडून खेळताना पुजाराच्या हॅमस्ट्रिंग तुटली होती.

यानंतर पुजाराचं कुटुंबीय त्याला राजकोटला आणू इच्छित होते. येथे त्यांना सर्जरी करायची होती. ही बाब KKR संघाचा मालक शाहरूखला कळाल्यानंतर त्याने पुजाराच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

रग्बी खेळाडूंना अशा प्रकारची दुखापत सातत्याने होत असते. अशा खेडाडूंवर दक्षिण अफ्रिकेतील डॉक्टर यशस्वीपणे सर्जरी करतात त्यामुळे चेतेश्वरवर दक्षिण अफ्रिकेत व्हायला हवी असा आग्रह शाहरूखचा होता.

पुजाराच्या वडिलांकडे नव्हता पासपोर्ट

पुजाराचं भवितव्य खूप चांगले आहे. त्यामुळे त्याच्यावर उत्तम वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे मत शाहरूखचे होते. यासाठी शाहरूख पुजाराच्या कुटुंबीयांना विमानाने दक्षिण अफ्रिकेला घेऊन जाण्यास तयार होता.

मात्र, यावेळी पुजाराच्या वडिलांनी आपल्याकडे पासपोर्ट नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर पासपोर्टसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पुजाराचे वडील चेतेश्वरसोबत दक्षिण अफ्रिकेला जाऊ शकले.

एक वर्षानंतर 2010 मध्ये पुजाराने त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता योगायोगाने याच संघाविरुद्ध तो उद्या 100वी कसोटी खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

Crime News: आठवीच्या मुलावर वर्गमित्रांकडूनच काठीने लैंगिक अत्याचार, आतड्यांना इजा, एक महिना रुग्णालयात

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

SCROLL FOR NEXT