सिंगापूर : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) सिंगापूर ओपनच्या (Singapore Open Super 500) फायनलपर्यंत (Final) धडक मारली आहे. तिने सेमी फायनलमध्ये जपानच्या साईना कावाकामीचा पराभव केला. सिंधूने हा सामना 21-15, 21-7 असा सरळ गेममध्ये जिंकला. या हंगामात सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर 300 टायटल जिंकली आहेत.
कावाकामी विरूद्धच्या हेड टू हेड सामन्यात सिंधू 2-0 ने आघाडीवर होती. कावाकामी सोबत ती 2018 मध्ये चायना ओपनमध्ये खेळली होती. कावाकामीने 2019 मध्ये ऑरलान्स मास्टर जिंकली होती. तर स्विस ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती.
हैदराबादच्या या 27 वर्षाच्या स्टार बॅडमिंटनपटूने या वर्षीच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची देखील कमाई केली होती. आता ती 2022 मध्ये आपल्या पहिल्या वहिल्या सुपर 500 टायटलच्या अगदी जवळ पोहचली आहे. जपानच्या एया ओहोरी आणि चीनच्या वांग झी यी यांच्यातील सेमी फायनलमध्ये जो जिंकेल तिच्यासोबत सिंधू फायनलमध्ये भिडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.