Rahul Dravid  esakal
क्रीडा

Rahul Dravid : वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक बदलणार; दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर कोण जाणार?

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Dravid : भारतीय संघ वर्ल्डकप 2023 च्या फायनलमध्ये पोहचला आहे. वर्ल्डकपची फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि त्यांचा सपोर्ट्स स्टाफ यांचा करार संपणार आहे.

दरम्यान, भारतीय संघ पुढच्या महिन्यात दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी भारतीय संघासोबत राहुल द्रविडच जाणार की दुसरा प्रशिक्षक संघासोबत असणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयने राहुल द्रविडबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

राहुल द्रविड फायनलनंतर आपल्या प्रशिक्षक पदाला पूर्णविराम देण्याचा विचार करत आहे. त्याच्या जागी काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण भारत - ऑस्ट्रेलिया टी 20 मालिकेसाठी काम पाहण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयला राहुल द्रविड आणि त्यांच्या टीमचा कार्यकाळ वाढवायचा आहे. मात्र याबाबतचा शेवटचा निर्णय हा माजी कर्णधार राहुल द्रविड(Rahul Dravid) वर अवलंबून असेल.

यापूर्वी बीसीसीआयने राहुल द्रविडच्या भविष्याचा निर्णय हा वनडे वर्ल्डकपमधील कामगिरीवर घेण्याचा निर्णय घेतला होता. आशिया कप 2022 आणि टी 20 वर्ल्डकप 2022 मधील पराभव, त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल यातील संघाच्या कामगिरीवर बीसीसीआय खूष नव्हती. मात्र आशिया कप 2023 आणि सध्या सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, 'राहुल द्रविडसोबत कराराचे नूतनीकरण किंवा मुदतवाढ याबाबत चर्चा झालेली नाही. सध्या आम्ही फक्त वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र आम्ही वर्ल्डकपनंतर याबाबत राहुलशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. सध्या तरी आम्हाली राहुलची प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा नाही असे संकेत मिळालेले नाहीत.'

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना मुदतवाढ मिळणार असल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे. मात्र त्यांना राहुल द्रविडप्रमाणे पदासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC News : विसर्ग सुरू; पवना, मुळा नद्यांच्या पातळीत वाढ; सखल भागांसह काठालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Crime News: आई कुठे आहे बाबा? वडिलांचं उत्तर ऐकून मुलं सुन्न झाली… "मी तुमच्या आईला मारले, तिला पुरून टाका"

Sunil Bagul : व्हिडिओ हटविण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; बागूल यांची अटकपूर्व सुनावणी पुढे ढकलली

Latest Maharashtra News Updates : बोगस बियाण्यांविरुद्ध छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

Nashik Citylink Bus : नाशिक सिटीलिंक बससेवेला ४ वर्षे पूर्ण; ८ कोटींहून अधिक प्रवासी, २४३ कोटींचा महसूल

SCROLL FOR NEXT