rahul tripathi may got chance in playing 11 for ind vs ban 2nd odi cricket news  sakal
क्रीडा

IND vs BAN: पराभवानंतर संघात मोठा बदल! 'या' धाकड खेळाडूची रॉयल एंट्री

संघाची फ्लॉप फलंदाजी पाहून धडाकेबाज फलंदाजाला खेळण्याची मिळू शकते संधी

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Odi Series : टीम इंडियाची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली आहे. उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप राहिली, ज्यामुळे संघाला 1 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेतील दुसरा सामना आता 7 डिसेंबर रोजी शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये अनेक मोठे बदल करू शकतो. संघाची फ्लॉप फलंदाजी पाहून धडाकेबाज फलंदाजाला खेळण्याची संधी मिळू शकते.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलशिवाय टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. भारतीय फलंदाजांच्या या खराब कामगिरीनंतर 31 वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठीला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. सलामीशिवाय राहुल त्रिपाठी मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. जरी तो अद्याप टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही.

राहुल त्रिपाठी बऱ्याच दिवसांपासून पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहे. IPL 2022 मध्ये राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 414 धावा केल्या होत्या. या चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात येत आहे. या मालिकेपूर्वी 4 मालिकेत त्याला टीम इंडियाच्या संघात स्थान देण्यात आले होते, मात्र या सर्व मालिकेत त्याला बेंचवर बसावे लागले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली राहुल त्रिपाठी दुसऱ्यांदा संघाचा भाग बनला आहे. यापूर्वी, इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केवळ 1 टी-20 सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि 41.2 षटकांत 186 धावा करून गडगडली. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 136 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या, मात्र 10व्या विकेटसाठी मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाकडून विजय हिसकावून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT