Ranji Trophy Final
Ranji Trophy Final 
क्रीडा

Ranji Trophy : मध्य प्रदेशच्या शतकवीराचे केएल राहुल स्टाईल सेलिब्रेशन

Kiran Mahanavar

Ranji Trophy Final: मुंबईविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला अंडरडॉग म्हणून पाहिले जात होते. परंतु मध्य प्रदेशचा सलामीवीर यश दुबेने मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी करताना शतक केले. यश आपला पहिला रणजी ट्रॉफी फायनल खेळत आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यश दुबेने उपाहारापूर्वी शतक पूर्ण केले. मध्य प्रदेशचा एकमेव गडी 47 धावांवर बाद झाला. मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. दुसरीकडे मध्य प्रदेशने दमदार पुनरागमन करत तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत 1 गडी गमावून 228 धावा केल्या. यश दुबे 101 धावांवर नाबाद राहिला.(madhya pradesh yash dubey century celebrated like kl rahul)

यश दुबेने 234 चेंडूत 12 चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफी फायनलमधील त्याचे हे पहिलेच शतक आहे. या खेळीमुळे मध्य प्रदेशने जबरदस्त पुनरागमन करण्यात यश मिळवले. दुसऱ्या टोकाला शुभम शर्मानेही शानदार फलंदाजी केली आहे. उपाहारापर्यंत तो 88 धावांवर नाबाद होता.

यश दुबेने दोन्ही हात कानावर ठेऊन असा आनंद साजरा केला. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. मध्य प्रदेशने त्यांच्या डावात 1 गडी गमावून 262 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभम शर्मानेही आपले शतक पूर्ण केले. तो 113 धावांवर नाबाद राहिला. शुभम शर्माचे रणजी ट्रॉफी फायनलमधील हे पहिले शतक आहे. याआधी शुभमने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 102 धावांची शानदार खेळी केली होती.

तत्पूर्वी, मुंबईच्या संघाने पहिल्या डावात 374 धावा केल्या होत्या. मुंबईकडून सर्फराज खानने 134 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वालने 78 धावा केल्या. तर पृथ्वी शॉ 47 धावा करून बाद झाला. मध्य प्रदेशकडून शानदार गोलंदाजी करताना गौरव यादवने सर्वाधिक 4 आणि अनुभव अग्रवालने 3 बळी घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT