Ravi Shastri Share Photo On Twitter Wearing Unique Cloths  esakal
क्रीडा

हार्दिकबरोबर हँगआऊट केलं की असं होतं; रवी शास्त्री झाले ट्रोल

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) कायम आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. मात्र सध्या ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही तर ट्विटरवर शेअर केलेल्या स्वतःच्या फोटोमुळे (Photo) चर्चेत आले आहेत. त्यांनी अतरंगी कपडे (Unique Cloths) घातलेले फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्याच्यावर कमेंटचा पाऊस पडू लागला आहे.

पहिल्यांदा रवी शास्त्रींनी काळा गॉगल, जॅकेट आणि गळ्यात गोल्डन चेन घातली. या फोटोला रवी शास्त्रींनी 'ज्यावेळी तुम्ही रात्री झोपत नाही त्यावेळी गुड मॉर्निंग हे वैकल्पिक असतं.' असं कॅप्शन दिलं. काही वेळाने रवी शास्त्री यांनी त्याच कपड्यात अजून एक फोटो शेअर करत त्याला 'माझे कुटुंब मुंबईत राहते आणि मी क्षणांमध्ये.' बर रवी शास्त्री एवढ्यावरच थांबले नाहीत. अतरंगी कपडे घालण्याचे त्यांना जणू व्यसनच लागले होते. काही तासांनी त्यांनी एका वृद्ध महिलेसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत त्यांनी गुलाबी रंगाचा मखमली कोट घातला होता. या फोटोला त्यांनी 'तुम्ही यांना डीएम म्हणता माझ्यासाठी त्या माझ्या व्हीआयपी गेस्ट आहेत.'

रवी शास्त्री यांच्या या अतरंगी फोटोशूटवर चाहत्यांना कमेंटचा पाऊस पाडला आहे. रवी शास्त्री यांनी असे अतरंगी कपडे घातलेले फोटो सोशल मीडियावर का शेअर केले याचे कराण समजू शकलेले नाही. मात्र चाहते या फोटोंवर भारी भारी कमेंट करत आहेत.

रवी शास्त्रींचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी काही महिने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ते कॉमेंटरी बॉक्समध्ये परतले आहेत. ते संध्या आयपीएल 2022 मध्ये हिंदीमधून समालोचन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Kolhapur News : पोलिसांचे साखर कारखानदारांना सहकार्य?, कोल्हापुरात उसाने भरलेली वाहने पेटवली; Video Viral

पडद्यावर बोलक्या नजरा, आयुष्यात विचारशील मन – स्मिता पाटीलच्या आठवणींना उजाळा

Latest Marathi News Update : १५ लाख कोटी रुपये पडून, पण कुशल कामगारच नाहीत : गडकरी

Success Story: पोलिओनं पाय रोखले, पण स्वप्नांना दिली उड्डाणं! सिन्नरच्या जिद्दी मधुमिता पुजारीची डॉक्टर होण्याकडे वाटचाल

Global Award : डॉ. बाबासाहेब सोनवणे यांच्या संशोधन कार्याचा सन्मान; सौदी अरेबियातील परिषदेत पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT