Ravichandran Ashwin Record Against Bangladesh : रविचंद्रन अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याचे बॉल्स समजणे इतके सोपे नाही. तो कॅरम बॉल टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याने आता कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याची प्रचिती बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाली. जेव्हा त्याने बॉल आणि बॅटने अप्रतिम खेळ दाखवला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह अश्विनने 34 वर्षे जुना विक्रमही आपल्या नावावर केला.
बांगलादेशने टीम इंडियाला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. एकेकाळी 74 धावांवर 7 विकेट गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता, परंतु त्यानंतर रविचंद्रन अश्विन नवव्या क्रमांकावर उतरला आणि त्याने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. यासह, तो 9व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना यशस्वी कसोटी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्यांच्यापूर्वी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध 40 धावा केल्या होत्या. आता अश्विनने हा विक्रम मोडीत काढला आहे.
बांगलादेशविरुद्ध झंझावाती खेळी केल्यानंतर रविचंद्रन अश्विन अनुभवी खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. कपिल देव, शॉन पोलॉक, स्टुअर्ट ब्रॉड, शेन वॉर्न आणि सर रिचर्ड हॅडली यांच्या पंक्तीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे 3000 हून अधिक धावा आणि 400 हून अधिक बळी आहेत. त्याने टीम इंडियासाठी 88 कसोटी सामन्यांमध्ये 449 विकेट आणि 3043 धावा केल्या आहेत.
रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्ध श्रेयस अय्यरसोबत 8व्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. या दोन्ही खेळाडूंमुळे टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. भारताने पहिला कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध 188 धावांनी तर दुसरा कसोटी सामना 3 गडी राखून जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.