ravindra jadeja asia cup 2022 sakal
क्रीडा

रवींद्र जडेजा झाला भावुक," माझ्या मृत्यूच्या देखील अफवा पसरवल्या पण..."

जडेजाने स्वत:शी संबंधित अफवांवर आणि हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याच्या तयारीवर खुलेपणाने भाष्य केले.

Kiran Mahanavar

Ravindra Jadeja Asia Cup 2022 : आशिया कप-2022 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात हार्दिक पांड्यासोबत रवींद्र जडेजाही भारताच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. हाँगकाँगविरुद्ध 31 ऑगस्टला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत जडेजाने स्वत:शी संबंधित अफवांवर आणि हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याच्या तयारीवर खुलेपणाने भाष्य केले.

शेवटची आयपीएल झाल्यावर माझ्याबद्दल वाट्टेल त्या बातम्या माध्यमातून फिरत होत्या. मी दुखापतीने बेजार आहे आणि पुढचा वर्ल्ड कपसुद्धा खेळू शकणार नाही, इथपासून ते माझ्या मृत्यूच्या देखील बातम्या आल्या होत्या, पण बाहेर काय चालू आहे, याकडे मी जास्त लक्ष देत नाही. सरावादरम्यान सतत सुधारणा करायला धडपडतो आणि सामन्यात त्याचा आधार घेऊन खेळतो, असे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने सांगितले.

पाकिस्तानसमोर मला संघाने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले ते आव्हान मला वाटले. भारतासाठी खेळत असताना दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची हिंमत ठेवावी लागते, असे जडेजा म्हणाला.

रवींद्र जडेजा याशिवाय आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या तयारीवर म्हणाला, आम्हाला टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी करायची आहे. पण सध्या आमचे संपूर्ण लक्ष 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यावर आहे. त्यानंतर सुपर फोरचा विचार करू. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळू इच्छितो आणि प्रत्येक सामन्यात आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी विश्वचषकाचा विचार नाही. आम्ही हाँगकाँगशी बरोबरी करण्यासाठी सज्ज आहोत. यानंतर, कोणता संघ पुढील स्पर्धा करेल ते पाहू.

जर भारताने हाँगकाँगला हरवले तर सुपर-4 मध्ये पोहोचेल. आशिया चषक स्पर्धेत भारताने हाँगकाँगचा दोनदा सामना केला आहे आणि दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Shirur Crime : टाकळी हाजी येथे शेताच्या वादातून हल्ला; दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर!

SCROLL FOR NEXT