Rishabh Pant sakal
क्रीडा

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अडचणीत वाढ! IPL नंतर वनडे वर्ल्ड कप 2023 मधूनही बाहेर?

मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमधून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे...

Kiran Mahanavar

Rishabh Pant Health : मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमधून ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाच्या जवळच्या सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, रुग्णालयातील डॉक्टरांना वाटते की पंतला मैदानात परतण्यासाठी किमान 8-9 महिने लागू शकतात. याचा अर्थ पंत केवळ आयपीएल 2023 मधूनच बाहेर पडणार नाही तर आशिया चषक 2023 आणि ऑक्टोबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकातूनही बाहेर जाऊ शकतो.(Rishabh Pant Health Bad News in Mumbai Hospital)

मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे संचालक डॉ पार्डीवाला यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी सकाळी पंतची तपासणी केली. सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, पंतची सूज कमी होईपर्यंत एमआरआय किंवा शस्त्रक्रिया केल्या जाणार नाही. रूग्णालयातील डॉक्टरांचे मत आहे की ऋषभ पंतच्या लिगामेंटला गंभीर दुखापत आहे, आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी 8-9 महिने लागतील.

बुधवारी ऋषभ पंतला बीसीसीआयने एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालानंतर बीसीसीआय पंतवर भारतात शस्त्रक्रिया करायची की शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेणार याचा निर्णय घेणार आहे. गुडघ्याच्या लिगामेंटच्या शस्त्रक्रियेला साधारणपणे 6 महिने लागतात. पण मुद्दा असा आहे की पंत हा यष्टिरक्षक आहे आणि त्याला क्रिकेटमध्ये परत येण्यापूर्वी त्याचा गुडघा आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. बाकी डॉक्टर पंतची नीट तपासणी करतील, त्यानंतरच खेळाडू कधीपर्यंत बरे होतील, हे सांगता येईल.

ऋषभ पंत 'या' मालिकेत नाही खेळणार

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (3 वनडे, 3 टी-20) – जानेवारी-फेब्रुवारी

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (4 कसोटी आणि 3 वनडे) – फेब्रुवारी-मार्च

  • IPL 2023 (एप्रिल-मे)

  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (जर भारत पात्र झाला तर) - जून

  • भारताचा वेस्ट इंडिज दौरा (जुलै)

  • आशिया कप 2023 - सप्टेंबर

  • ICC एकदिवसीय विश्वचषक – ऑक्टोबर/नोव्हेंबर

ऋषभ पंतला दुखापत झाल्यानंतर आता आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या नवीन कर्णधाराचा शोध घ्यावा लागेल. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्सची कमान डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्याची शक्यता आहे. गरज भासल्यास संघ मुंबईचा फलंदाज सर्फराज खानला विकेटकीपिंग देऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT