Sachin Tendulkar Road Safety World Series 2022  esakal
क्रीडा

Video | Sachin Tendulkar : काळाचे चक्र उलटे फिरले, जेव्हा सचिन तेंडुलकरने तो...

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar : भारताचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या Road Safety World Series 2022 स्पर्धेत इंडियन लेजंड्स संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा इंडिया लेजंड्स आणि दक्षिण आफ्रिका लेजंड्स यांच्यात झाला. नेतृत्वातील इंडिया लेजंड्सने हा सामना 61 धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 20 षटकात 4 बाद 217 धावांचे आव्हान ठेवले. स्टुअर्ट बिनीने 24 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान, सलामीला आलेल्या सचिन तेंडुलकरने फक्त 16 धावांची योगदान दिले. मात्र या खेळीत देखील त्याने असे काही फटके मारले त्यामुळे चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

सलामीला आलेल्या सचिन तेंडुलकर आणि वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी यांच्यात जुगलबंदी सुरू होती. दरम्यान, सचिन तेंडुलकरने एन्टिनीला लाँग ऑनला एक लॉफ्टेड शॉट मारला. सचिनचा हा शॉट पाहताना जुन्या सचिनची आठवण झाली. कानपूर स्टेडियममधील चाहत्यांनी सचिनचा हा शॉट पाहून जल्लोष करण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर देखील या शॉटची चर्चा सुरू झाली आहे. नेटकरी सचिनच्या या लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा व्हिडिओ शेअर करत आहेत.

सचिन तेंडुलकरला अखेर एन्टिनीनेच बाद केले. सचिन सामन्याच्या सहाव्या षटकात बाद झाला. सचिनने 16 धावा केल्या. त्यानंतर भारताकडून स्टुअर्ट बिनी तुफानी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत राहुल शर्मा आणि प्रज्ञान ओझा या फिरकी जोडीने भेदक मारा करत भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 61 धावांनी विजय मिळवून दिला. भारताने Road Safety World Series 2022 ची दमदार सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT