Rohan Bopanna and Matthew Ebden Sakal
क्रीडा

Rohan Bopanna: रोहन बोपन्नाची घौडदौड चालूच! 44 व्या वर्षी गाठली मियामी ओपन स्पर्धेची फायनल

Miami Open 2024: भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन यांनी मियामी ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

Pranali Kodre

Rohan Bopanna and Matthew Ebden: भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यु एब्डेन यांच्या जोडीने मियामी ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

त्यांनी गुरुवारी (28 मार्च) उपांत्य सामन्यात मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबालोस यांना पराभूत करत या हंगामातील दुसरी अंतिम फेरी गाठली. यापूर्वी बोपन्ना आणि एब्डेन यांनी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.

दरम्यान, गुरुवारी मिळवलेल्या विजयासह 44 वर्षीय बोपन्ना पुन्हा एकदा दुहेरीत जागतिक्रवारीमध्ये अव्वल स्थान मिळवले. बोपन्ना आणि एब्डेन यांनी उपांत्य फेरीत ग्रॅनोलर्स आणि झेबालोस यांनी 6-1,6-4 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.

या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये बोपन्ना आणि एब्डेन यांनी पूर्ण वर्चस्व ठेवलं होतं, तर दुसऱ्या सेटमध्ये ग्रॅनोलर्स आणि झेबालोस यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु, बोपन्ना आणि एब्डेन यांनी त्यांना वरचढ होऊ दिलं नाही.

आता अंतिम सामन्यात बोपन्ना आणि एब्डेन यांना इव्हान डोडिग आणि ऑस्टिन क्रॅजिसेक यांचा सामना करायचा आहे.

दरम्यान, बोपन्नाने एटीपी मार्स्टर्स 1000 स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पोहचण्याची ही 14 वी वेळ आहे, तर मियामी ओपनमध्ये तो पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याचबरोबर एकूण 63 व्यांदा तो एटीपी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला असून आत्तापर्यंत त्याने 25 वेळा दुहेरीत विजेतेपद जिंकले आहे.

इतकेच नाही, तर बोपन्ना लिअँडर पेसनंतरचा दुसराच भारतीय टेनिसपटू आहे, ज्याने सर्व 9 एटीपी मास्टर्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT