IND vs AUS 1st Test Day 2 esakal
क्रीडा

IND vs AUS : कांगारूंना रोहित, जडेजाने दिला फलंदाजीचा धडा; पदार्पण करणाऱ्या मर्फीला 5 विकेट्सची बर्फी

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 1st Test Day 2 : ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी आणि क्रिकेट पंडितांनी नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टीच्या नावाने बोटे मोडण्यास सुरुवात केली होती. कारण त्यांचा लाडका संघ 177 धावात दोन सत्रातच गाशा गुंडाळून पॅव्हेलियनमध्ये पोहचला होता.

मात्र दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या दिवसापासून चेंडू टर्न होणाऱ्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची याचा धडाच कांगारुंना शिकावला. कर्णधार रोहित शर्माचे झुंजार शतक, अक्षर आणि रविंद्र जडेजा या डावखुऱ्या जोडगोळीची अर्धशतके या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 321 धावांपर्यंत मजल मारली.

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी कांगारूंवर पहिल्या डावात 144 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताने दुसऱ्या दिवशी 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. अश्विन आणि कर्णधार रोहितने डाव कांगारूंना कोणतीही संधी न देता खेळपट्टीवर जम बसवत भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 100 पार करून दिली. मात्र अश्विन सेट झाला असे वाटत असतानाच टॉड मर्फीने त्याला 27 धावांवर बाद केले.

सहसा फिरकीला पोषक खेळपट्टीवर एक विकेट पडली की त्याच्या जोडीला एका दोन आणखी विकेट्स पडतात. आजही तसेच झाले. अश्विन पाठोपाठ चेतेश्वर पुजारा 7 धावा करून बाद झाला. यानंतर मर्फीने विराट कोहलीची 12 धावांवर शिकार केली. दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्मा नेटाने फलंदाजी करत आपल्या शतकाकडे कूच करत होता. इतक्यात नॅथन लयॉनने पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला 8 धावांवर बाद केले. सूर्या बाद झाला त्यावेळी भारताच्या 200 धावा देखी झाल्या नव्हत्या.

मात्र कर्णधार रोहितने आपले शतक पूर्ण करत भारताला 200 चा टप्पा पार करून दिला. मात्र त्यानंतर कर्णधारानेच कर्णधाराचा काटा काढला. पॅट कमिन्सने नवीन चेंडूवर रोहितचा उत्कृष्ट आऊट स्विंगवर त्रिफळा उडवला आणि भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रीकार भरत आणि रविंद्र जडेजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टॉड मर्फीने भरतला 8 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. मर्फीने आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या.

मात्र भरतची विकेट ही भारताची दुसऱ्या दिवशी पडलेली शेवटीची विकेट ठरली. यानंतर दोन डावखुऱ्या फलंदाजांनी कांगारूंच्या नाकात दम केला. रविंद्र जडेजाने अक्षर पटेलच्या साथीने आठव्या विकेटसाठी 81 धावांची दमदार भागीदारी रचली. जडेजाने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही दमदार पुनरागमन केले. जडेजा आणि अक्षर पटेल यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत ऋषभ पंतची संघाला उणीव भासू दिली नाही. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जडेजा 66 तर अक्षर पटेल 52 धावा करून नाबाद होते.

फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ही आघाडी निर्णायक ठरेल. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा फिरकीपटू टॉड मर्फीने 5 विकेट्स घेत भारताच्या कसलेल्या फलंदाजीला भगदाड पाडले. त्याला नॅथन लयॉन आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या धुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT