Sachin Tendulkar Cheteshwar Pujara esakal
क्रीडा

Sachin Tendulkar : 'आक्रमक' कसोटी क्रिकेटच्या पाठीराख्यांना सचिनने लगावला अप्रत्यक्ष टोला

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Cheteshwar Pujara : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला स्वतःची बॅटिंग स्टाईल न बदलण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये बॅझबॉलचा जमाना असल्याचं बोललं जात आहे. भारतही कसोटी क्रिकेट आक्रमक पद्धतीने खेळण्यास पसंती देतो. अशा परिस्थितीत चेतेश्वर पुजारा सारख्या संथ पण भक्कम इनिंग खेळणाऱ्या खेळाडूवर निश्चितच दबाव येतो.

सचिन तेंडुलकरने याबाबतच चेतेश्वर पुजाराला एक मोलाचा सल्ला दिला. तेंडुलकरने चेतेश्वर पुजाराच्या 35 व्या वाढदिवसाचे (25 जानेवारी) औचित्य साधून एक ट्विट केले. सचिन तेंडुलकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'हाताची सर्व पाच बोटे सारखी नसतात. प्रत्येक कसोटी फलंदाजाने मोठे फटके मारले पाहिते असंही काही नाही. फलंदाजीच्या आक्रमक फळीला देखील चांगल्या प्रकारे बचाव करता आला पाहिजे. पुजारा तू भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ आहेस. असाच अद्वितीय रहा. तुझ्यातलं वेगळेपण जप! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'

चेतेश्वर पुजाराने 98 कसोटी सामने खेळत 44.39 च्या सरासरीने 7,014 धावा केल्या आहेत. यात 19 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटीत नाबाद 206 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे.

भारताने 2018 - 19 आणि 2020 - 21 मध्ये ऑस्ट्रेलियात बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत भारताच्या विजयात मोलाची भुमिका बजावली होती. पुजाराने 2018 - 19 च्या मालिकेत 74.42 च्या सरासरीने 521 धावा केल्या होत्या. पुजारा त्या मालिकेतील टॉप स्कोरर होता. भारताने ही मालिका 2 - 1 ने जिंकली होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election : बंडखोरी करणारे भाजपचे ३२ जण निलंबित; अग्रवाल, भगवान मेंढे, दीपक चौधरीचा समावेश

Nagpur Crime : प्रेमसंबंधातून बहीण-भावावर हल्ला; दोघेही गंभीर जखमी, आरोपी अटक

दुर्दैवी घटना! गोरेगावमधील भगतसिंग नगरमध्ये भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Budget 2026 : करदात्यांसाठी खुशखबर! येणाऱ्या बजेटमध्ये ‘या’ ५ गोष्टींमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; तुम्हाला नेमका काय फायदा?

World GK : भविष्य सांगणारा आरसा ते मेलेल्या लोकांशी बोलण्यापर्यंत..! 'या' 7 गॅझेट्सनी जगाला हादरवलंय

SCROLL FOR NEXT