Sachin Tendulkar give Cricket Coaching to Internet Sensation SK Shahid
Sachin Tendulkar give Cricket Coaching to Internet Sensation SK Shahid  ESAKAL
क्रीडा

VIDEO: शेन वॉर्नने स्तुती केलेल्या शाहिदला लाभला क्रिकेटच्या देवाचा स्पर्श

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसके शाहिद (SK Shahid) हा 5 वर्षाचा छोटा क्रिकेटर अद्याप कोणत्याही संघाकडून खेळत नाही. मात्र त्याची इवल्याशा वयात देखील सोशल मीडियावरील फॅन तगडी आहे. त्याच्या बॅटिंगचे तर शेन वॉर्न (Shane Warne), स्टीव्ह वॉ, सौरभ गांगुली (Sourav Ganguly) देखील फॅन आहेत. मध्यंतरी शेन वॉर्न देखील त्याची बॅटिंग पाहून अवाक झाला होता. त्याने एसके शाहिदला भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. आता या शाहिदला क्रिकेटच्या देवाचा म्हणजे खुद्द सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) सहवास लाभला.

इंटनेट सेंन्सेशन (Internet Sensation) असलेल्या शाहिदला सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली (Sachin Tendulkar Cricket Coaching) 5 दिवस सराव करण्याची संधी मिळाली. मुळचा कोलकात्याचा असलेल्या शाहिदला सचिन तेंडुलकरच्या मिडलसेक्स ग्लोबर अ‍ॅकेडमीत (Middlesex Global Academy) सराव करण्याची संधी मिळाली. तेही त्याचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरसोबत!

शाहिदच्या या आयुष्य बदलून टाकणाऱ्या अनुभवाबद्दल राशीदचे वडील शेख समशेर (Shaikh Shamser) यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'माझा मुलगा फक्त 5 वर्षाचा आहे. त्याचा आदर्श सचिन तेंडुलकर सर आहेत. त्यांना पाहणं म्हणजे एक स्वप्नच होते. शाहिदला एक क्रिकेटर व्हायचं आहे. सचिन तेंडुलकरला फक्त पाहणं हेच त्याचं स्वप्न होतं. मात्र सचिन सरांनी जे केलं त्याचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत.'

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही शाहिदचे बॅटिंग करतानाचे व्हिडिओ ट्विटवर अपलोड करत असतो. यातील एक व्हिडिओ फॉक्स क्रिकेटने ट्वट केला. हा एक ऑस्ट्रेलियन चॅनेल आहे. या चॅनेलने व्हिडिओ शेअर करताना सचिन तेंडुलकर, मायकेल वॉगन आणि शेन वॉर्नला टॅग केले होते. ज्यावेळी सचिन तेंडुलकर यांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हापासून त्यांच्या अ‍ॅकेडमीतील एक सदस्य आमच्याशी संपर्कात होता असे आम्हाला वाटते.'

सचिन तेंडुलकरने शाहिद आणि त्याच्या कुटुंबियांना मुंबईत आणण्यासाठीचा आणि पाच दिवस राहण्याचा सर्व खर्च केला. याचबरोबर त्याने शाहिदच्या वडिलांची सचिनने आपल्या मुलाला प्रशिक्षण द्यावी ही इच्छा देखील पूर्ण केली.

सचिनने शाहिदला काय शिकवले हे देखील त्यांच्या वडिलांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. सचिनने कोणता चेंडू बॅकफूटला खेळायचा आणि कोणता चेंडू फ्रंट फूटवर खेळायचा हे शिकवले. याचबरोबर त्याला झेल कसा पकडायचा हे देखील त्याने सांगितले. त्यांनी आम्हाला सर्व काही शिकवले. त्यांनी या मुलाकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे याचे भविष्य उज्वल आहे असेही सांगितले.' सचिनने मुलाच्या भविष्यासाठी काय योजना आहेत असेही वडील समशेर यांनी विचारले त्यावेळी त्यांनी ते सध्या मुलासाठी चांगल्या व्यावसायिक क्लबच्या शोधात असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT