Sachin Tendulkar esakal
क्रीडा

Sachin Tendulkar : अन् चेहऱ्यावर हास्य उमटलं... सचिन तेंडुलकरने शेअर केला काश्मिरी मुलीचा VIDEO

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Share Video Of Hurmat Irshad Bhat : सचिन तेंडुलकरने नुकतेच जम्मू काश्मीरला भेट दिली होती. तो पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करत होता. यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या चाहत्यांना आणि काही विशेष क्रिकेटपटूंना देखील भेट दिली. याचे व्हिडिओ सचिनने आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले होते. सचिनने काश्मीर विलो बॅट तयार करणाऱ्या फॅक्ट्रीला देखील भेट देत मेड इन इंडियाचे प्रमोशन केलं होतं.

आता सचिन तेंडुलकरने जम्मू काश्मीरमधील सोपोर येथील एका मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्यांच तो सांगतो.

सचिनने हुरमत इर्शाद भट या मुलीचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हुरमत ही तिच्या वयाच्या मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसते. डावखुरी हुरमत ज्या प्रकारे मुलांच्या गोलंदाजीवर टोलेबाजी करत होती ते पाहून सचिन देखील भारावला.

सचिन हा व्हिडिओ शेअर करून म्हणाला की, 'छोट्या मुली क्रिकेट खेळताना पाहून कायम भारी वाटतं. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटतं.'

सचिन तेंडुलकर हा आपल्या जम्मू काश्मीर ट्रिपबद्दल लिहितो की, 'जम्मू काश्मीरचा सुंदर अनुभव माझ्या स्मृतीत कायम राहील. तेथे सर्वत्र बर्फ आहे मात्र मला तिथं एक वेगळा उबदारपणा जाणवला. तो उबदारपणा तेथील लोकांच्या आदरातिथ्यामुळे जाणवला.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT