Sanju Samson 
क्रीडा

Sanju Samson : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजू टीम इंडियाचा उपकर्णधार?

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही.

Kiran Mahanavar

Sanju Samson India vs South Africa ODI Series : संजू सॅमसन सध्या भारत अ संघाचा कर्णधार आहे. भारत-अ आणि न्यूझीलंड-अ यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. उद्यापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 खेळणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. शिखर धवनला कमान मिळू शकते, तर सॅमसनला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही. यानंतर अनेक तज्ञांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.

इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संजू सॅमसनला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संजू सॅमसनने आतापर्यंत टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यांच्या 6 डावांमध्ये 44 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. अर्धशतक केले आहे. सॅमसनचा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत 103 डावात 31 च्या सरासरीने 2806 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 15 अर्धशतके केली आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत रजत पाटीदारलाही संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये MP चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने बॅटने अप्रतिम कामगिरी केली होती. शुभमन गिल, उमरान मलिक आणि राहुल त्रिपाठी यांनाही वनडे संघात संधी मिळू शकते. गिल सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

Latest Marathi News Live Update : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा हल्लाबोल : "विरोधकांची मतं नाही, मती चोरीला गेली आहे!"

रोज पोटावर मांडीवर इंजेक्शन, अभिनेत्रीने बाळ होण्यासाठी 'अशी' घेतली ट्रीटमेंट, म्हणाली...'मला बेशुद्ध होण्यासाठी...'

Breathing Exercises: फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी ‘ब्रीदिंग एक्सरसाईज’ का गरजेची? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं

MPSC Exam Result : वडिलांच्या निधनानंतरच्या नैराश्‍यातून बाहेर पडून ‘तिने’ साधली ‘प्रगती’; प्रगती जगताप अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT