Sourav Ganguly Virat Kohli Show Cause Notice issue esakal
क्रीडा

कारणे दाखवा नोटीसवर सौरभ गांगुलीचा खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावणार होता असे वृत्त आले होते. सौरभ गांगुलीने या वृत्तावर आज खुलासा केला आहे. हे वृत्त खरे नाही असे सांगितले. (Sourav Ganguly says News of show cause notice to Virat Kohli is not true)

सौरभ गांगुलीने एएनआयशी बोलताना याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत सौरभ गांगुलीच्या वक्तव्याच्या परस्पर विरोधी वक्तव्य केल्यानंतर विराट कोहली खरं बोलतोय की सौरभ गांगुली खरं बोलतोय असा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी या घटनाक्रमाबाबतची एक माहिती समोर आली होती.

सौरभ गांगुली विराट कोहलीच्या या परस्पर विरोधी वक्तव्य करण्यावर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावणार होता. मात्र बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सौरभ गांगुलीला थांबवले अशी चर्चा होती. त्यावर सौरभ गांगुलीने जे काही वृत्त आले आहे ते खरे नाही असे सांगितले.

ज्यावेळी विराट कोहलीला हटवून रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा कर्णधार करण्यात आले होते. त्यावेळी सौरभ गांगुली विराट कोहलीला टी २० संघाचे कर्णधारपद सोडू नको असे वैयक्तिकरित्या सांगितल्याचे एका मुलाखतीत म्हणाला होता. निवड समितीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नको होते.

दरम्यान, एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन डच्चू मिळाल्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्याने मला कोणीही टी २० संघाचे कर्णधारपद सोडू नको असा सल्ला दिला नव्हता असे सांगत सौरभ गांगुलीला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला होता. या पत्रकार परिषदेने खळबळ उडाली होती.

मात्र बीसीसीआयने या प्रकरणात अजून काही वक्तव्य न करता हे प्रकरण त्यांच्या दृष्टीने संपल्याचे संकेत दिले होते. यानंतर वाद शमला असे वाटत असतानाच विराट कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटी कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला. यानंतर काही दिवसातच सौरभ गांगुली विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस बजावणार होता असे वृत्त आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT