SriLanka vs Australia
SriLanka vs Australia  sakal
क्रीडा

Sl vs Aus Test: श्रीलंकेच्या विजयात चंडिमल, जयसूर्या चमकले

Kiran Mahanavar

Sri Lanka vs Australia Test: अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमलच्या नाबाद २०६ धावा आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रबाथ जयसूर्या याने पदार्पणातच केलेली सर्वोत्तम कामगिरी (१२ बळी) याच जोरावर यजमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीत एक डाव व ३९ धावांनी पराभूत केले आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.(Sri Lanka vs Australia Test Sri Lanka Win Match Draw Series 1-1)

श्रीलंकेने ६ बाद ४३१ या धावसंख्येनंतर सोमवारी पुढे खेळायला सुरुवात केली. दिनेश चंडिमल याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून श्रीलंकेच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. त्याने ३२६ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व ५ षटकारांसह नाबाद २०६ धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेसाठी एका डावात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा मान त्याने संपादन केला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४ व मिचेल स्वेपसनने ३ फलंदाज बाद केले.

जयसूर्या या फिरकी गोलंदाजाने या कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून १२ फलंदाज बाद केले. पहिल्याच कसोटीत १२ किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाज टिपणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने चौथे स्थान पटकावले. भारताचा नरेंद्र हिरवाणी १६ फलंदाजांना बाद करीत पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या आरएल मॅसी याने १६, इंग्लंडच्या एफ मार्टीनने १२ फलंदाज टिपत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. जयसूर्याने १२ फलंदाजांना बाद करीत चौथ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १५१ धावांमध्येच गडगडला. पहिल्या डावात ११८ धावांवर ६ फलंदाज बाद करणाऱ्या जयसूर्याने दुसऱ्या डावातही ५९ धावा देत ६ मोहरे टिपले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT