Ravindra Jadeja Steve Smith IND vs AUS 1st Test esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : थम्स अप टेस्ट द... फिरकीवर नाचवणाऱ्या जडेजाला स्मिथने दिली ढासू रिअ‍ॅक्शन

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Steve Smith IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र सिराज - शमी जोडीने त्याची अवस्था 2 बाद 2 धावा अशी केली.

यानंतर मात्र स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशानेने चिवट फलंदाजी करत भारतीय फिरकीचा नेटाने सामना केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. यादरम्यान भारताचा पुनरागमन करणारा फिरकीपटू रविंद्र जडेजाने दोघांनीही चांगलचे सतावले होते. जडेजाच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथची तर भांबेरी उडत होती.

मात्र असे असतानाही स्टीव्ह स्मिथचे हातवारे काही थांबत नव्हते. रविंद्र जडेजाच्या एका उत्तम चेंडूने स्टीव्ह स्मिथला चांगलेच चकवले होते. विशेष म्हणजे स्मिथने देखील या चेंडूला चांगला प्रतिसाद देत रविंद्र जडेजाला थम्स अप दाखवले. मार्नसह लाबुशेन आणि आर. अश्विनचा देखील पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात माईंड गेम सुरू असल्याचे दिसले.

पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 2 धावा अशी झाली असताना मार्नस आणि स्मिथ या जोडीने कांगारूनां सावरले. त्यांनी लंचपर्यंत भारतीय फिरकीपटूंचा नेटाने सामना केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जडेजाने ही जोडी फोडली.

लंचनंतर दुसऱ्याच षटकात रविंद्र जडेजाने 49 धावांवर खेळणाऱ्या मार्नसला भरतकरवी स्टम्पिंग केले. जडेजा इथंच थांबला नाही. त्याने पुढेच्यात चेंडूवर मॅट रेनशॉला देखील आल्या पाहवली माघारी धाडले. जडेजाने 107 चेंडूत 37 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील बाद करत कांगारूंची अवस्था 4 बाद 109 धावा अशी केली.

(Sports Latest News)

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT