T20 World Cup IPL ICC BCCI
T20 World Cup IPL ICC BCCI  sakal
क्रीडा

T20 World Cup विजेत्याला IPL चॅम्पियनपेक्षा मिळणार कमी पैसा, ICC पेक्षा BCCI श्रीमंत?

Kiran Mahanavar

T20 World Cup vs IPL Winner Prize Money : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या T20 विश्वकरंडकासाठी बक्षिसांची रक्कम आज जाहीर केली. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला 16 लाख अमेरिकन डॉलर (सुमारे 13 कोटी, 3 लाख रुपये) रक्कम मिळणार आहे; तर उपविजेत्या संघाला त्याच्या निम्मे म्हणजे 8 लाख डॉलर (6 कोटी 51 लाख रुपये) मिळणार आहेत. एकूण बक्षीस रक्कम 56 लाख डॉलरची (45 कोटी रुपये) आहे. वर्ल्ड कपमध्ये मिळालेल्या बक्षीस रकमेची तुलना जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलशी केली जात आहे. चला जाणून घेऊ या दोघांमध्ये काय फरक आहे...

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या एकूण बक्षीस रक्कम पाहिली तर $5.6 दशलक्ष (सुमारे 45.68 कोटी रुपये) आहे. त्याच वेळी आयपीएलच्या गेल्या हंगामात मध्ये बक्षीस म्हणून सुमारे 46.5 कोटी रुपये खर्च झाले होते. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये देण्यात आले. टी-20 विश्वचषकापेक्षा ही रक्कम सात कोटी रुपये जास्त आहे. त्याचवेळी अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला आयपीएमध्ये 13 कोटी रुपये मिळणार होते.

आयपीएलमध्ये क्वालिफायर-2 मध्ये पराभूत झालेल्या संघाला सात आणि एलिमिनेटर सामन्यात पराभूत झालेल्या संघाला 6.5 कोटी रुपये देण्यात आले होते. टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांना एकत्र करून एवढी रक्कम खर्च केली जाईल. प्रत्येक संघाला सुमारे 3.26 कोटी रुपये दिले जातील. बक्षीस रकमेच्या बाबतीत आयपीएल या आयसीसी स्पर्धेपेक्षा खूप पुढे आहे.

अशी आहे बक्षीस रक्कम

  • विजेता संघ - 16 लाख डॉलर

  • उपविजेता संघ- 8 लाख डॉलर

  • उपांत्य फेरीत पराभूत होणारे संघ- प्रत्येकी 4 लाख डॉलर (एकूण 8 लाख डॉलर)

  • सुपर- 12 फेरीत प्रत्येक विजय मिळवणाऱ्या संघाला- 40 हजार डॉलर (एकूण 12 लाख डॉलर )

  • सुपर -12 फेरीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक संघाला- प्रत्येकी 70 हजार डॉलर (एकूण 5 लाख 60 हजार डॉलर)

  • पहिल्या फेरीत विजय मिळवणाऱ्या प्रत्येक संघाला- 40 हजार डॉलर (एकूण 4 लाख 80 हजार डॉलर)

  • पहिल्या फेरीतून बाद होणाऱ्या चार संघांना - प्रत्येकी 40 हजार डॉलर (1 लाख 60 हजार डॉलर)

आयपीएल 2022 बक्षीस रक्कम

  • विजेता - 20 कोटी

  • उपविजेता - 13 कोटी रु

  • 3 नंबर टीम - सात कोटी

  • या स्पर्धेच्या साखळी फेरीतून बाद होणारा संघ - 6.5 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT