Team India Prithvi Shaw Not Selected 
क्रीडा

IND vs SL: पृथ्वी शॉवर अन्याय! मालिकेत संधी न मिळाल्यामुळे सोशल मिडियावर तांडव...

Kiran Mahanavar

Team India Prithvi Shaw Not Selected : पृथ्वी शॉने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण पृथ्वी सध्या भारतीय संघाबाहेर असून बराच काळ तो पुनरागमन करू शकलेला नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यात नववर्षानिमित्त होणाऱ्या मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे. जवळपास दीड वर्षानंतरही तो पुनरागमन करू शकलेला नाही. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याच वेळी शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. पृथ्वीने भारतासाठी 6 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र सध्याच्या कामगिरीने तो निवडकर्त्यांना प्रभावित करू शकला नाही.

पृथ्वी शॉवर अन्याय होत असल्याचे चाहत्यांचे मत आहे. पृथ्वीबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला संघात न घेण्याचे कारणही बीसीसीआयला विचारले आहे.

  • भारतीय टी-20 संघ -

    हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

  • भारतीय एकदिवसीय संघ -

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT