काल्पनिक फोटो
Female Basketball Player Punjab Moga District
काल्पनिक फोटो Female Basketball Player Punjab Moga District Sakal
क्रीडा

महिला बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच छतावरून ढकलले

अनिरुद्ध संकपाळ

चंदीगड : पंजाबच्या मोगा जिल्ह्यात 18 वर्षाच्या बास्केटबॉलपटूवर तीन युवकांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या बास्केटबॉलपटूने विरोध करताच त्यांनी तिला स्टेडियमच्या छतावरून खाली ढकलून दिले. यामुळे या युवतीच्या शरीरामध्ये अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित खेळाडूला लुधियानामधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या दोन्ही पायाला आणि जबड्याला झालेल्या दुखापतीवर तेथे उपचार सुरू आहेत. ही घटना 12 ऑगस्ट रोजी झाली आहे. तेव्हापासून तीनही आरोपी फरार आहेत. (Three Young Boy Attempt Rape On Female Basketball Player In Punjab Moga District)

पीडित खेळाडूच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी बास्केटबॉलचा सराव करण्यासाठी मोगा येथील स्टेडियमवर गेली होती. त्यावेळी जतिन कांडा नावाच्या एका आरोपीने स्टेडियममध्ये तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तिने याला विरोध केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कांडाने तिला 25 फूट उंचीवरून खाली धक्का दिला. पीडित खेळाडू खाली पडल्याने गंभीर जखमी झाली.

आरोपी कांडा आणि त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 307 (खूनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुलनीत खुराना यांनी आरोपींचा शोध घेतला जात आहे असे सांगितले. दरम्यान, पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, बास्केटबॉलपटूचे दोन्ही पाय आणि जबडा फ्रॅक्चर आहे. तिची दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र ती अजूनही पूर्णपणे शुद्धीत आलेली नाही.

दुसरीकडे पीडितेच्या वडिलांनी सांगितले की पोलीसांनी एफआयआर दाखल करण्यास उशीर केला. त्यांची मुलगी रूग्णालयात आहे आणि बोलण्याच्या स्थितीत नाही. तरी देखील पोलिसांनी तिचा नुकताच जबाब नोंदवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : गुजरात टायटन्सने सीएसकेला दिले 232 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT