MS Dhoni And Dinesh Bana  Sakal
क्रीडा

VIDEO : धोनीचा 'बाणा' दिनेशचा फिनिशिंग सिक्सर अन् खास योगायोग

सुशांत जाधव

U19 World Cup, Ind U19 vs Eng U19 Final : वेस्ट इंडीजच्या आँटिगाच्या मैदानात यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर 19 संघाने पाचव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघासमोर 190 धावांच आव्हान ठेवलं होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात संघाचे आणि वैयक्तिक खाते न उघडता रघुवंशीच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर उपकर्णधार शेख राशीदनं सलामीवर हरनूर सिंगच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. या भागीदारीनं भारतीय संघाच्या आशा जिंवत केल्या. (U19 World Cup Dinesh Bana Indian wicketkeeper finishing a world cup final with six after MS Dhoni)

उप कर्णधार शेख राशीदनं स्पर्धेतील सलग दुसऱ्या अर्धशतकाने भारतीय संघाच्या आशा फोल ठरणार नाहीत याची खात्री झाली. निशांत सिंधूनं (Nishant Sindhu) अष्टपैलू राज बावाच्या (Raj Bawa) साथीनं भारतीय संघाला विजयाच्या समीप नेलं. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. 47 व्या षटकात भारतीय संघाने कौशक तांबेच्या रुपात सहावी विकेट गमावली. 22 चेंडूत 14 धावांची गरज असताना निशांतची साथ द्यायला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना (Dinesh Bana) क्रिजमध्ये आला.

18 चेंडूत 12 धावांची गरज असताना 48 व्या षटकातील पहिल्या निशांतने खणखणीत चौकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दिनेश बानाने सलग दोन षटकार मारले. त्याने उत्तुंग षटकार मारून भारतीय संघाचा विजय साकारला. त्याची ही झलक धोनीची आठवण करुन देणारी होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये असाच उत्तुंग षटकार खेचून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. बानाही अंडर 19 संघात विकेट किपिंगची जबाबदारी सांभाळत होता. त्याने षटकार मारून विजय मिळवून देत धोनी स्टाईल फिनिशिंग टच दिल्याने कमालीचा योगायोग क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT