jaskaran malhotra  Twitter
क्रीडा

VIDEO : भारतीय वंशाच्या फलंदाजाची कमाल; 6 चेंडूत 6 षटकार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरलाय.

सुशांत जाधव

आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच युएईच्या मैदानात युवराज सिंगच्या पराक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. भारतीय वंशाच्या जसकरन मल्होत्राने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मूळ भारतीय वंशाचा असलेला मल्होत्रा अमेरिकेतील टेक्सास येथे वास्तव्यास आहे. अमेरिका आणि पपुआ न्यू गिनी यांच्यातील सामन्यात एका षटकात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. व्यावसायिक क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचणारा मल्होत्रा हा दहावा फलंदाज ठरलाय.

ओमानच्या अल अमिरातच्या मैदानात पपुआ न्यू गिनी विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मल्होत्रा 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. अमेरिकेच्या डावातील अखेरच्या षटकात गौडी टोका गोलंदाजी करत होता. या षटकात मल्होत्राने 6 चेंडूत 6 षटकार खेचले. या सामन्यात त्याने 124 चेंडूत नाबाद 173 धावांची खेळी केली. मल्होत्राच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर अमेरिकेने 273 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यू पपुआ गिनीचा संघ 37.1 षटकात 137 धावांत आटोपला. अमेरिकेन हा सामना 134 धावांनी जिंकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा मल्होत्रा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज (Harschelle Gibbs) (2007) याने वनडेत 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) (2007) इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात षटकाराचा धमाका केला होता. वेस्टइंडिजचा फलंदाद केरॉन पोलार्डने (Kieron Pollard) (2021) आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अशी कामगिरी करुन दाखवली होती.

क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचणारे फलंदाज

गॅरी सोबर्स (1968), रवी शास्त्री (1985), हर्शल गिब्स (2007), युवराज सिंग (2007), रॉस विटेली (2017), हजरतुल्लाह जजई (2018), लियो कार्टर (2020), केरॉन पोलार्ड (2021), थिसारा परेरा (2021)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: भात आणि ऊस कापणीच्या काळात कोल्हापुरात ४० जणांचा सर्पदंशाने मृत्यू.

Latest Marathi News Live Update : परळीत मुंडे समर्थकांचे आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Yoga for Diabetes and Hernia: फक्त पचनासाठी नाही तर मधुमेह अन् हार्नियावरही प्रभावी ठरते 'हलासन'; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

मनसेसोबत युती करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, मविआच्या नेत्यांना दिला सल्ला

Kolhapur Guns License : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक पाच हजार बंदुका जमा करण्याचे आदेश, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT