Wrestler Protest Vinesh vs Babita Phogat esakal
क्रीडा

Wrestler Protest Vinesh vs Babita Phogat : माझी बहिण बबिता मी तुला हात जोडून विनंती करते... विनेशने बबिताला फटकारले

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest Vinesh vs Babita Phogat : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत देशाच्या पदक विजेत्या कुस्तीपटूंनी जंतर मंजरवर आंदोलन सुरू केले आहे. आता या आंदोलनाला वेगळे वळण लागले. देशाकडून कुस्तीत पदके पटकावणाऱ्या फोगाट भगिनी एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. आंदलोनाला बसलेली विनेश फोगाट आणि भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेली बबिता फोगाट यांच्यात शाब्दिक द्वंद्व पेटले आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वधेरा यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतल्यानंतर बबिता फोगाटने यावर टीका केली होती. याला विनेश फोगाटने प्रत्युत्तर दिले आहे. विनेश म्हणाली की, 'माझी बहिण बबिता जर तुला पीडित कुस्तीपटूंच्या बाजूने उभे रहाता येत नसेल मी तुला हात जोडून विनंती करते एकच विनंती करते आमची चळवळ कमकूवत करू नकोस. महिला कुस्तीपटूंना त्यांच्याविरूद्धच्या अन्यायाविरूद्ध उभे राहण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत. तू देखील एक महिलाच आहेस. आमच्या वेदना समजून घे.'

भाजप सदस्य असलेली बबिता फोगाटने प्रियांका गांधी वधेरा यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंशी चर्चा केल्यावर ट्विट करत टीका केली होती. ती म्हणाली होती की, 'प्रियांका गांधी वधेरा या त्यांचे स्वीय सचिव संदीप सिंह यांच्यासह जंतर मंतरवर महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवा म्हणून पोहचल्या. मात्र ज्या व्यक्तीबरोबर त्या आल्या होत्या त्याच्यावरच महिलांशी गैरवर्तन आणि दलित महिलेचा अपमान केल्याचे आरोप आहेत.' बबिताने गेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT