Wanindu Hasaranga Sri Lanka Cricket News marathi news  sakal
क्रीडा

Sri Lanka Cricket News | नव्या वर्षात संघाला मिळाला नवा कर्णधार, 'या' खेळाडूच्या हाती दिली धूरा

Sri Lanka Cricket News | 6 जानेवारीपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका

Kiran Mahanavar

Sri Lanka Cricket News : श्रीलंका क्रिकेटमध्ये आता सध्या खूप बदल होत आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही निलंबित केले होते. आता आणखी एक बदल श्रीलंकेत होताना दिसत आहे.

दुखापतीमुळे वनडे वर्ल्ड कप खेळू न शकलेल्या वानिंदू हसरंगाला टी-20 संघाची कमान देण्यात आली आहे. तर अष्टपैलू दासुन शनाकाच्या जागी कुसल मेंडिसला श्रीलंका एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. चरित असलंकाची दोन्ही फॉरमॅटमध्ये नवा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

श्रीलंका क्रिकेटने शनिवारी (30 डिसेंबर) पुढील महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. शनाका दोन्ही संघांचा एक भाग आहे.(Sri Lanka Cricket News in Marathi)

2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान शनाका दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्यानंतर मेंडिसला संघाचे कर्णधारपद मिळाले. त्याने स्पर्धेत सात सामन्यांचे नेतृत्व केले, ज्यामध्ये श्रीलंकेने केवळ 2 सामने जिंकले.

संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्रता गमावली. हसरंगाने कधीही श्रीलंकेच्या संघाचे कोणत्याही फॉरमॅटमध्ये नेतृत्व केलेले नाही. (Sri Lanka News in Marathi)

नव्या वर्षात श्रीलंकेला 2024 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करायचा असून या दौऱ्यावर हसरंगाकडे या संघाची जबाबदारी दिली आहे. हसरंगा दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

हसरंगाची गणना सध्या सर्वोत्तम लेगस्पिन गोलंदाजांमध्ये केली जाते. अलीकडच्या काळात त्याने श्रीलंकेच्या संघासाठी शानदार गोलंदाजी केली आहे. लंका प्रीमियर लीग आणि आयपीएलमध्येही त्याने अप्रतिम गोलंदाजी केली.

श्रीलंकेला 6 जानेवारीपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 14 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT