Wrestler Protest  esakal
क्रीडा

Wrestler Protest : कुस्तीपटूंच आंदोलन म्हणजे दुसरं 'शाहीन बाग', बृजभूषण यांचा पद सोडण्यास नकार

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest : भारतीय कुस्ती परिषदेचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बृजभूषण सिंग यांनी आपले पद सोडण्यास नकार देत या आंदोलनाची तुलना शाहीन बाग आंदोलनाशी केली.

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू केले आहे. आज तिसऱ्या दिवशी या आंदोलनात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी. उशा यांनी उडी घेत खेळाडूंशी चर्चा केली.

दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर बृजभूषण सिंह हे राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र बृजभूषण यांनी स्थानिक पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार ते राजीनामा देणार नाहीयेत.

टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बृजभूषण म्हणाले की, 'आंदोलक खेळाडू हे काँग्रेस आणि दीपिंदर हुड्डा यांचे खेळणे आहेत. अशा प्रकारचे षडयंत्र काँग्रेसने तीन दशकापूर्वी माझ्याबाबतीत केले होते. ते पुन्हा तेच षडयंत्र रचत आहेत.'

बृजभूषण पुढे म्हणाले की, 'मी यापूर्वीही सांगितले होते की यामागे मोठे शक्तीशाली लोकं आहेत. आता ते चेहरे समोर येत आहेत.' बृजभूषण यांनी सांगितले की, 'काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी आणि दीपिंदर हुड्डा यांनी केलेल्या ट्विटवरून सगळे चित्र स्पष्ट होत आहे. हा माझ्यावर हल्ला नाही तर तो भाजपवर हल्ला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT