world test championship sakal
क्रीडा

पाकिस्तानकडून भारताला फायदा; श्रीलंकेला हरवल्यानंतर WTC मध्ये मोठे फेरबदल

पाकिस्तानने गॉल कसोटीत श्रीलंकेचा चार विकेट्सनी पराभव केला

Kiran Mahanavar

world test championship : पाकिस्तानने गॉल कसोटीत श्रीलंकेचा चार विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयामुळे पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदा झाला आहे. पाकिस्तानने डब्ल्यूटीसी टेबलमध्ये एका स्थानाने झेप घेत तिसऱ्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेला त्याच वेळी पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे मोठा फटका बसला आहे. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावरून थेट सहाव्या स्थानावर आला आहे.

गॉल कसोटी संपल्यानंतर पाकिस्तानचे 56 गुण आणि 58.33 गुणांची टक्केवारी आहे. पाकिस्तानने world test championship (2021-23) मध्ये आतापर्यंत एकूण सहा कसोटी सामने खेळले आहे. पाकिस्तानने यातील चार सामने जिंकले असून दोन सामन्यात त्याचा पराभव झाला. श्रीलंकेचे गुण केवळ 52 आहे, परंतु पॉइंट टक्केवारीत घट झाली आहे. श्रीलंकेची पॉइंट टक्केवारी 48.15 ईतकी झाली आहे. श्रीलंकेने आतापर्यंत आठ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी चार जिंकले आणि चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आतापर्यंत टीम इंडियाने 12 कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय यातील सहा जिंकले असून चार पराभव पत्करले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला आता कोणतीही कसोटी खेळायची नाही. दुसरीकडे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला दोन्ही सामने जिंकता आले, तर ते गुणांच्या टक्केवारीत भारताला चांगली आघाडी घेता येईल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेने सात कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी पाच जिंकले असून दोनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन संघ 10 कसोटी सामने खेळला आहे. यापैकी सहा कसोटी जिंकले आहे आणि एकात पराभव पत्करावा लागला आहे.

भारताविरुद्ध विजय मिळवूनही इंग्लंडसाठी मार्ग अत्यंत कठीण आहे. इंग्लंड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. 16 पैकी फक्त पाच सामने जिंकलेल्या इंग्लंडचे 33.33 टक्के गुण आहेत आणि ते सातव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Suraksha Bill: विधानसभेत 'जनसुरक्षा विधेयक' सादर; कायद्याची आता गरज का पडली? यात काय खास असेल?

Navi Mumbai News: वाहतुकीचे नियमच धाब्यावर, नो पार्किंगचे फलक नावापुरते; नागरिक हैराण पण पोलीस...

Suresh Dhas: 'त्याच' स्पॉटवर शेळके कुटुंबातल्या चौघांचा झाला होता अपघाती मृत्यू; आता सागर धसच्या गाडीने नितीन शेळकेचा जीव घेतला

Latest Maharashtra News Updates : आयएफएस अजनीश कुमार उरुग्वेचे राजदूत

Katraj News : येवलेवाडी-कोंढवा मेट्रो मार्गाला मंजुरी द्या; आमदार योगेश टिळेकर यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT