WTC Points Table 
क्रीडा

WTC Points Table: पाकिस्तानचे भंगले स्वप्न! भारताचं काय होणार, कसं आहे गणित?

Kiran Mahanavar

WTC Points Table India : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर गेला आहे. त्याचा घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 2-0 अशा पराभव केला. मुलतान कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा संघ 42.42% विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानशिवाय इंग्लंडचा संघही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंड संघ 44.44% विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याचं उत्तर हो आहे, पण टीम इंडियासाठी पुढचा रस्ता अजिबात सोपा नाही.

टीम इंडियाचे फायनल गाठण्याचे कंस आहे गणित ?

भारताला बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या 6 कसोटी सामन्यांमध्ये जर टीम इंडियाने 2 कसोटी सामने गमावले तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधून भारताचा पत्ता कट होईल. त्याचबरोबर WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशचा 2-0 असा पराभव करावा लागेल. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 किंवा 3-0 अशी मालिका जिंकल्यास भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकल्यानंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी 75% वर गेली आहे. येथून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ 60% विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या तर श्रीलंका संघ 53.33% विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

MP Nitin Patil: सातारा जिल्हा परिषद प्रकरणाचा मास्टर माइंड शोधा: खासदार नितीन पाटील, गुन्‍हा जबरदस्‍तीने, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT