Wrestler Protest Brij Bhushan Sharan Singh
Wrestler Protest Brij Bhushan Sharan Singh  esakal
क्रीडा

Wrestler Protest : परमेश्वर माझ्याकडून मोठं काम करवून घेणार... लैंगिक शोषणाचा आरोपांवर बृजभूषण हे काय म्हणाले?

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्धचे महिला कुस्तीपटूंचे आंदोलन तीव्र झाले आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत फेकून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बृजभूषण म्हणतात की परमेश्वर माझ्याकडून काही मोठं काम करवून घेऊ इच्छितो. यामुळेच माझ्यावर अशा प्रकारचे आरोप लावण्यात आले आहेत. जर माझ्या विरूद्ध महिला कुस्तीपटूंनी लावलेले लैंगिक शोषणाचे आरोप जर सिद्ध झाले तर मी फासावर लटकेन असेही ते म्हणाले.

बृजभूषण यांनी सांगितले की, 'जेव्हापासून माझ्यावर आरोप होत आहेत. मी विचारतोय की हे सगळं कधी झालं, कुठं झालं. आम्ही अयोध्यामध्ये राहतो. इथे प्राण जातो मात्र वचन जात नाही. चार महिने झाले आरोप लावून. मी म्हणतोय की माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी फासावर लटकेन. मा यावर आजही कामय आहे.'

कुस्तीपटू त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्यास निघाले आहेत. यावर बोलताना बृजभूषण म्हणाले की, 'गंगेमध्ये पदके विसर्जित करून काही होणार नाही. हे फक्त भावनिक नाटक आहे. जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते पोलिसांना द्या कोर्ट मला फाशी देईल.'

कलयुगात काहीही होऊ शकते

बृजभूषण म्हणाले की, कबीर दास यांनी सांगितले होते की कलयुगात काहीही होऊ शकते. यासाठी मी लढलो. ते म्हणाले होते की प्रभू रामांना जर वनवास झाला नसता तर इतिहास कसा रचला गेला असता. याचे श्रेय कैकई आणि मंथराला दिलं पाहिजे.'

'मी या खेळाडूंशी आजही वैर ठेवत नाही. ही माझीच मुलं आहेत. यांच्या यशात माझा देखील वाटा आहे. 10 दिवसांपूर्वी हे मला त्यांच्या यशाचा परमेश्वर म्हणत होते. माझ्या कार्यकाळात जो संघ 18 व्या स्थानावर होता तो 5 व्या स्थानावर आला आहे. ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल धील 5 कुस्तीतील मेडल माझ्या कार्यकाळात आली आहेत. आता मला काहीतरी मोठं करायचं आहे. या वर्षी 5 तारखेला संतांचा कार्यक्रम आहे. पाप करणाराच पापी नसतो तर जो मौन बाळगतो त्यात भागीदार असतो.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT