social media sakal
लाइफस्टाइल

Social Media: शंभरापैकी ८० लग्न मोडण्यामागे सोशल मीडिया; वाचा काय आहे प्रकरण

सोशल मीडियाचा सर्वात जास्त दुष्परिणाम वैवाहीक आयुष्यावर पडलाय.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय पण आपली माणसं दुरावली आहेत. आपल्या आजुबाजूला बसणाऱ्या लोकांसाठी या सोशल मीडियाच्या जगात आपल्याकडे वेळच नाही. सोशल मीडियाचा सर्वात जास्त दुष्परिणाम वैवाहीक आयुष्यावर पडलाय.

गेल्या सहा महिन्यांमध्ये नवरा बायकोच्या वादावरुन ट्रस्ट सेलकडे १३०० च्यावर तक्रारी आल्या असून त्यातील ८० टक्के तक्रारीमागे सोशल मीडिया कारणीभूत आहे.

नवरा बायकोच्या वादाचं बहुताशं कारण हे मोबाईल आहे, त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की जेव्हापासून माणसाच्या आयुष्यात मोबाईल आला तेव्हापासून अनेक नाते, लोक माणसापासून दुरावले आहे.

या तक्रारींमध्ये सतत फोनवर बोलणे, मोबाईल जास्त वेळ वापरणे अशी शुल्लक कारणे आहेत. सुरवातीला हुंडा, घरगुती हिंसाचार यामुळे घटस्फोट होत असे तर आता या सोशल मीडियामुळे.

trust सेलकडे नवरा बायको यांच्यातील वाद प्रकरणी तक्रार आल्यानंतर ते या तक्रारी समुपदेशाद्वारे निकाली काढतात मात्र काही वाद-प्रकरण मार्गी निघत नाही, अशावेळी शेवटी गुन्हा दाखल केला जातो.

या तक्रारी कशा प्रकारच्या असतात?

  • जुन्या मित्र-मैत्रिणीसोबत मोबाईलवर बोलणे

  • मोबाईलवर टाईम पास करणे.

  • मित्र मैत्रीणींसोबत चॅटिंग करणे.

  • सतत फोन वापरत असल्याने अनैतिक संबंध असल्याचा दोघांमध्ये संशय असणे

  • सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यावरुन मतभेद होणे

  • पार्टनर समोर असतानाही मोबाईल वापरत राहणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT