Alia Ranbir Wedding Anniversary esakal
लाइफस्टाइल

Alia Ranbir Wedding Anniversary : 50 लाखांची साडी, त्यावर कोरलीय आयुष्यभराची आठवण

आलियाच्या साडीत असं काय खास होतं ते आपण जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Alia Ranbir Wedding Anniversary : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. 14 एप्रिल 2022 रोजी दोघांनी लग्नाची सात वचनं एकमेकांना दिली आणि एकमेकांचे लाइफ पार्टनर झालेत.

लग्नाआधीपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. बी-टाउनच्या बहुतांश अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात हेवी ब्राइडल लेहेंगा घातला होता, मात्र आलियाने आयव्हरी कलरची साडी निवडली ज्यामध्ये ती एखाद्या प्रिंसेसप्रमाणे दिसत होती. आलियाच्या लुकवर सगळ्यांचंच लक्ष असलं तरी तरी तिच्या साडीवरच्या एका भागावर मात्र कोणाचंच लक्ष गेलं नाही. साडीवर तिने आयुष्यभराची एक खास आठवण कोरली आहे. चला तर मग आलियाच्या साडीत असं काय खास होतं ते आपण जाणून घेऊया.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या लग्नाचा हा पहिला वाढदिवस फारच खास आहे कारण त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्यांची मुलगी राहासुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी आहे. लग्नाच्या वाढदिवशी सोनी राजदान आणि नीतू कपूर यांनी प्रेमळ पोस्ट टाकून दोघांना एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

आलियाने फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली आयव्हरी रंगाची साडी कस्टमाइझ करून घेतली होती. रणबीरही त्याच्यासोबत ट्यून करताना दिसला. अभिनेत्रीची ही साडी हाताने बनवण्यात आली होती, ज्यामध्ये ऑर्गेन्झा आणि सिल्कसारखे फॅब्रिक वापरण्यात आले होते.

आलियाच्या साडीवर होती लग्नाची तारीख

आलियाने तिच्या साडी अशा एका गोष्टीची नोंद केली होती जी कायम तिच्या लक्षात राहील. तिच्या साडीवर तिच्या लग्नाची डेट लिहीली होती. साडीचा आकर्षक असा फोटो सब्या साचीने इंस्टाग्रामवसुद्धा शेअर केलाय, ज्यात स्पष्ट दिसतं की तिच्या लग्नाची तारीख सिल्व्हर धाग्याने शिवली गेली आहे. साडीच्या पदरावर लग्नाची तारीख द फोर्टिंन्थ ऑफ एप्रिल असे लिहीले आहे.

ब्रायडल लूक आणि ज्वेलरी

आलियाच्या या साडीवर गोल्डन टिल्ला वर्क करण्यात आले होते, ज्यामध्ये तिने बटरफ्लाय मोटिफ्सना खास स्थान दिले होते. या लूकसह तिने सब्यसाचीच्या हेरिटेज कलेक्शनमधील डायमंड आणि मोत्यांचे दागिने मॅच केले होते. या साडीची किंमत 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

आलियाने लग्नाच्या साडीवर कोल्हापुरी स्टाइलची ब्लॉक हिल घातली होती. अभिनेत्रीने ही हील्स Stoffastyle कडून घेतली होती. ऑफिशियल वेबसाइटनुसार त्याची किंमत 3800 रुपये सांगितल्या गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं? परबांनी थेट घरातल्याच मुद्द्याला हात घातला, ३० वर्षांपूर्वीचा इतिहास उगाळला

Prakash Abitkar : पालकमंत्री पहिल्यांदा एवढे चिडले, कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर सगळ्याचं अधिकाऱ्यांना चांगलाच धुतला; काय घडलं नेमकं?

Kolhapur Politics : सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार?

Vijay Deverakonda Net Worth: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? किती आहे संपत्ती?

मोठी बातमी : भारतात 'चिकन' खाऊन आजारी पडले क्रिकेटपटू; एकाला तातडीने दाखल करावे लागले हॉस्पिटलमध्ये

SCROLL FOR NEXT