Anant Chaturdashi esakal
लाइफस्टाइल

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी आणि भगवान श्रीविष्णूंचा आहे थेट संबंध, आजच्या दिवशी करा हा उपाय, अडचणी होतील दूर   

हे खास रक्षासूत्र परिधान करण्याचा विधी जाणून घ्या

Pooja Karande-Kadam

Anant Chaturdashi: हिदू धर्मात प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. आता आजचच घ्या ना. आज अनंत चतुर्दशी आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केलं जात हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण, आजचा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित आहे.

अनंत चतुर्दशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना, उपवास आणि कथा वाचल्याने शुभ फळांची प्राप्ती होते. तसेच या दिवशी 14 गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र (धागा) धारण करावे. भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.  

अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा

अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा, ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते.

सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे

अनंत चतुर्दशीला बांधलेला १४ गाठीचा धागा हा १४ लोकांचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये भूर्लोक, भुवरलोक, स्वरलोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, अटल, विठ्ठल, सतल, रसातल, तलताल, महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो. अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते.  

या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते. रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच आहे, तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते,अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

असे मानले जाते की, जो व्यक्ती चौदा वर्षे सातत्याने सर्व नियमांसह पूजा करतो आणि अनंत सूत्राला चौदा गाठी बांधतो, त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते.

रक्षासूत्र कसे परिधान करावे

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवांचे पूजन आरती करा. यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी. हा कलश म्हणजे भगवान विष्णूचे रूप आहे. त्यानंतर रेशमी धाग्याला हळद आणि कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा.

त्या धाग्याच्या १४ गाठी बांधा. फळे, फुले, हळद, अक्षता, प्रसाद इत्यादी अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी. पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीची व्रत कथा वाचा आणि नंतर उजव्या हातात हा पवित्र धागा धारण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT