Ashadhi Wari 2023  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2023 : दिंडी चालली ! पंढरपूर आषाढी वारीचे वेळापत्रक पहा एका क्लिकवर!

कुठे कुठे असेल पालखीचा मुक्काम?

Pooja Karande-Kadam

Ashadhi Wari 2023 : जून महिन्याची सुरवात होते आणि तहानलेल्या चातकाला जशी पावसाची ओढ लागते. त्याहुव जास्त ओढ वारकऱ्यांना विठू माऊलीच्या दर्शनाची लागलेली असते. जून महिन्याच्या अखेरीस आषाढी वारी असते. त्यामुळे संपुर्ण जून महिना महाराष्ट्रातून आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपुरात दाखल होतात.

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.  ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.

 

 

यावर्षी २९ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. त्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र देहू संस्थानने वेळापत्र काढले आहे. यंदाचे पालखी सोहळ्याचे ३३८वे वर्ष आहे. पालखीचं १० रोजी प्रस्थान होईल. २८ जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल. हा १९ दिवसांचा पालखी प्रवास असणार आहे.

 

आज (१० जून) रोजी दुपारी २ तारखेला पालखीचं प्रस्थान होईल.

पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे होणार आहे.

११ जून रोजी आकुर्डी

१२ जून रोजी नानारपेठ

१३ जून रोजी नानारपेठ निवडुंगा विठ्ठल मंदिर

१४ जून रोजी लोणीकाळभोर

१५ जून यवत

१६ जून वरवंड

१७ जून रोजी उंडवडी गवळ्याची

१८ जून बारामती

१९ जून रोजी सणसर

२० जून रोजी आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम.

२१ जून निमगाव केतकी

२२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम

२३ जून रोजी सराटी

२४ जून रोजी निरा स्नान व तिसरे गोल रिंगण आणि अकलूज येथे मुक्काम.

२५ जून रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, तर रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल.

२६ जून रोजी सकाळी धावा रात्री पालखी मुक्का पिराची कुरोली येथे होणार आहे.

२७ जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व वाखरी येथे मुक्काम.

२८ जून रोजी वाखरीवरुन पालखी पंढरपुरात दाखल होईल.

दुपारी उभे रिंगण व त्यानंतर पंढरपुरातील संत तुकाराम महाराज मंदिर येथे पालखी सोहळा होईल.

बुधवार, दि २९ जून रोजी तुकाराम महाराज संस्थान मंदिर येथे पालखी मुक्कामी असेल.

२९ जून ते ३ जुलै रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महारज संस्थानच्या नवीन इमारतीमध्ये असेल. नंतर परतीचा प्रवास सुरु होईल.

१३ जुलै रोजी पालखी देहू येथे विसावेल.

ज्ञानदेवांची पालखी

हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक...

११ जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान.

१२ जून रोजी भवानी पेठ, पुणे.

१३ जून रोजी पुणे.

१४ जून रोजी सासवड.

१५ जून रोजी सासवड.

१६ जून रोजी जेजुरी.

१७ जून रोजी वाल्हे.

१८ जून रोजी लोणंद.

१९ जून रोजी लोणंद.

२० जून रोजी तरडगाव.

२१ जून रोजी फलटण (विमानतळ)

२२ जून रोजी बरड.

२३ जून रोजी नातेपुते.

२४ जून रोजी माळशिरस.

२५ जून रोजी वेळापूर.

२६ जून रोजी भंडीशेगाव.

२७ जून रोजी वाखरी.

२८ जून रोजी पंढरपूर.

२९ जून रोजी आषाढी वारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT