Relationship tips sakal
लाइफस्टाइल

या वाईट सवयीमुळे तुमचं नातं खराब होऊ शकतं

तुमच्या नात्यात अडथळा आणणाऱ्या या वाईट बाबी कोणत्या, जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

कोणतीही व्यक्तीही परिपूर्ण नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही कमतरता असतेच पण कधी कधी तुमच्या वाईट सवयी तुमच्या नात्याच्या मधे येऊ शकतात आणि तुमचे नाते शेवटच्या टोकाला जाऊ शकते. या बाबी वेळेत लक्षात आल्या तर योग्यच अन्यथा भविष्यात तुम्हाला मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल. तुमच्या नात्यात अडथळा आणणाऱ्या या वाईट बाबी कोणत्या, जाणून घ्या. (bad habits that can accidentally ruin your relationship)

खोटे बोलेणे

नातं विश्वासावर टिकून असतं. कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही जी नेहमी खोटं बोलते. जर तुमचा पार्टनर सतत खोटं बोलत असेल किंवा तुम्ही खोटं बोलत असाल तर तुमचं नातं संपण्याच्या मार्गावर आहे

आपल्या फोनवर सतत असणे

काहीवेळा कामाची गंभीरता समजू शकतो मात्र जर तुम्ही तुमच्या फोनवर सतत असाल तर तुमच्या पार्टनरमध्ये तुम्ही त्यांना दुर्लक्षित करत असल्याची भावना निर्माण होईल.

सार्वजनिक ठिकाणी पार्टनरवर विनोद करणे

तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी तुमच्या पार्टनरवर विनोद करत असाल तुम्ही केलेला विनोद तुमच्या पार्टनरला आवडला नसेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. तुमचा पार्टनर अशा गोष्टीत तुमच्यासोबत कम्फरटेबल असणे गरजेचे आहे.

अपमान करणे

तुम्ही सतत तुमच्या पार्टनरला घालून पाडून बोलत असाल तर हे चुकीचे असून नाते संपूष्टात येण्याची जास्त शक्यता आहे. आपल्या पार्टनर चा अपमान करणे हे सुद्धा नाते गमवण्याचे लक्षण आहे.

पार्टनरच्या कुटुंबावर टीका करणे

जोडीदाराच्या कुटूंबावर टीका करणे तुम्हाला महागात पडू शकते. प्रत्येकाला स्वत:चे कुटूंब आवडते.कुणीही स्वत:च्या कुटूंबाबत वाईट ऐकू शकत नाही. त्यामुळे पार्टनरच्या कुटुंबावर टीका करणे, घातक ठरु शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT