Vitamin B12 Rich Natural Food  sakal
लाइफस्टाइल

Vitamin B12 Natural Sources: 'या' पदार्थांचे सेवन करुन नैसर्गिकरित्या वाढवा व्हिटॅमिन B12 ची पातळी

Naturally Boost Vitamin B12 Levels: योग्य पदार्थांचा आहारात समावेश केल्याने नैसर्गिकरित्या B12 ची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. शरीरात थकवा, गरगरणे, मुंग्या येणे यांसारखी लक्षणं दिसत असल्यास ती व्हिटॅमिन B12 ची कमतरता दर्शवू शकतात.

  2. अंडी, दूध, चीज, मासे, कलेजी आणि फोर्टिफाइड अन्नपदार्थ यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने नैसर्गिकरित्या B12 वाढवता येते.

  3. B12 चा मेंदू, मज्जासंस्था आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने दररोजचे योग्य प्रमाणात सेवन अत्यावश्यक आहे.

Boost Vitamin B12 Levels Naturally: तुम्हाला जर गरगरणे, थकवा हे सातत्त्याने जाणवत असेल तर ती तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 कमी असल्याची लक्षणे आहेत. मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी हे पोषक तत्त्व अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12 अनेक अन्नपदार्थांमध्ये आढळते. अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्याने नैसर्गिकरित्या B12 ची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे

B12 ची कमतरता अ‍ॅनिमिया होण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे रक्तपेशी मोठ्या आणि असामान्य होतात व त्यांची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. तसेच हाता पायांमध्ये मुंग्या येणं किंना सुन्न पडणं, धुसर दिसणं, खूप जास्त घाम येणं, वारंवार तोंड येणं याचसोबत ताप आणि बद्धकोष्ठता अशी काही लक्षणं दिसून येतात.

या पदार्थांचे सेवन ठरेल उपयुक्त

अंडी

अंडी हि सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. अंड्याच्या पिवळ्या भागात म्हणजेच यॉलक मध्ये B12 आढळते. अंडी प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात, ज्यामुळे ती पोषकतत्त्वांचा उत्तम स्रोत ठरतात.दररोज एका अंड्याचा आहारात समावेश केल्यास नैसर्गिकरित्या B12 वाढवता येईल.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

शाहाकारींसाठी व्हिटॅमिन B12 साठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन हा एक उत्तम पर्याय आहे. दूधामध्ये पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमिन B12 आढळते. शिवाय यात शरिरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखी पोषक तत्वे देखील उपलब्ध असतात.

चीज

चीज हे व्हिटॅमिन B12 चे एक उत्तम स्रोत आहे. यामुळे पदार्थांमध्ये चव आणि पोषणमूल्य दोन्ही वाढते. शिवाय हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडीचे आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात आहारात चीजचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

कलेजी

कलेजी व्हिटॅमिन B12 चे मुख्य स्रोत आहे.तसेच याव्यतिरिक्त कलेजी लोह, व्हिटॅमिन ए यांसारख्या पोषकतत्वांनी समृद्ध आहे. अनेकांना याची चव आवडत नसली तरी आठवड्यातून काही वेळा त्याचा आहारात समावेश केल्यास B12 पातळीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

मासे

मासे हे विटामिन B12 चे मुख्य स्त्रोत आहेत. रावस, कोळंबी, कुपा या माश्यांसोबतच खेकडे, शिंपले यांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन B12 आढळते. त्यामुळे जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारामध्ये सीफूडचा नक्की समावेश करा.

चिकन ब्रेस्ट

चिकन ब्रेस्टमध्ये मुबलक प्रमाणात B12 आढळून येते. तुमच्या आहारात चिकन ब्रेस्टचा समावेश केल्याने इतर पोषकतत्वांसह B12 ची पातळी निरोगी राखण्यास मदत होऊ शकते.

दही

दही व्हिटॅमिन B12 मध्ये समृद्ध आहे. तसेच प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे, जो पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या आहारात दह्याचा समावेश केल्याने पचन आणि एकूण आरोग्यासाठी अतिरिक्त फायदे मिळताना B12 पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते.

फोर्टिफाइड अन्नपदार्थ

आजकाल बाजारात शरीरातील व्हिटॅमिन्सची पूर्तता करण्यासाठी फोर्टिफाइड अन्नपदार्थ उपलब्ध होऊ लागले आहे. जे अन्नपदार्थ नैसर्गिकरित्या नसलेले पोषकतत्त्वे अतिरिक्त स्वरूपात जोडून समृद्ध केले जातात, त्यांना फोर्टिफाइड अन्नपदार्थ म्हणतात. फोर्टिफाइड सीरियल्स B12 चे भरगोस पुरवठा करतात. तसेच त्यामध्ये इतर जीवनसत्त्वे व खनिजे देखील असतात.

दररोज किती व्हिटॅमिन B12 आवश्यक आहे?

व्हिटॅमिन B12 चे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सेवन करण्यासाठी गरजेचे असलेले प्रमाण वेगळे आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांसह प्रौढांसाठी दररोज 2.4 मायक्रोग्रॅम B12 आवश्यक आहे. गर्भवती महिलांसाठी ही गरज 2.6 मायक्रोग्रॅम आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी 2.8 मायक्रोग्रॅम आहे. योग्य आहार किंवा पुरेशा आहाराद्वारे B12 ची पातळी टिकवणे गरजेचे आहे.

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

व्हिटॅमिन B12 ची कमतरता विविध न्यूरोलॉजिकल समस्यांना कारणीभूत ठरू शकते, ज्यामध्ये सुन्नपणा, मुंग्या येणे, आणि संज्ञानात्मक दुर्बलता यांचा समावेश होतो. आहारातून किंवा पूरक आहाराच्या मदतीने B12 चे पुरेसे सेवन केल्याने मज्जातंतूंचे कार्य सुधारते आणि संपूर्ण न्यूरोलॉजिकल आरोग्याला चालना मिळते.

मेंदूच्या आरोग्यासाठी B12 अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे मायलिनची निर्मिती करण्यात सहाय्य करते, जे मज्जातंतूंना संरक्षण देते आणि न्यूरॉन्समधील प्रभावी संवाद सुरळीत करते. तसेच, B12 न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी आधार देते, जे मूड नियंत्रित करण्यासह इतर कार्यांसाठी महत्त्वाचे आहेत.

FAQs

  1. व्हिटॅमिन B12 ची कमतरता झाली असल्यास कोणती लक्षणं दिसू शकतात? (What are the symptoms of Vitamin B12 deficiency?)
    थकवा, अशक्तपणा, हाता-पायाला मुंग्या येणे, तोंड येणे, धुसर दिसणे, आणि बद्धकोष्ठता ही लक्षणं सामान्यतः दिसतात.

  2. व्हिटॅमिन B12 नैसर्गिकरित्या कसे वाढवू शकतो?
    (How can I increase Vitamin B12 levels naturally?)
    अंडी, दूध, चीज, मासे, कलेजी, आणि फोर्टिफाइड अन्नपदार्थांचा आहारात समावेश करून B12 नैसर्गिकरित्या वाढवता येतो.

  3. दररोज किती व्हिटॅमिन B12 आवश्यक असते? (How much Vitamin B12 is required daily?)
    प्रौढ पुरुष व स्त्रियांना दररोज 2.4 मायक्रोग्रॅम, गर्भवती महिलांना 2.6 मायक्रोग्रॅम आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना 2.8 मायक्रोग्रॅम B12 आवश्यक असते.

  4. व्हिटॅमिन B12 चा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? (How does Vitamin B12 affect mental health?)
    B12 मज्जासंस्थेचं कार्य सुधारतं, न्यूरोट्रांसमीटरची निर्मिती करतं आणि मूड व संज्ञानात्मक कार्यांमध्ये मदत करतं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT