Chaitra Gouri 2023  esakal
लाइफस्टाइल

Chaitra Gouri 2023 : चैत्र नवरात्रीच्या उपवासाला काय चालतं काय नाही?

उपवास कसा असावा? या बद्दल काय सांगत शास्त्र!

सकाळ डिजिटल टीम

आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. चैत्र नवरात्र 22 ते 30 मार्चपर्यंत असेल. देशभरातील अंबा मातेचे भक्त हा 9 दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. नवरात्र साधारणपणे वर्षाच्या वेगवेगळ्या महिन्यांत चार वेळा साजरी केली जाते.

शारदीय नवरात्री, चैत्र नवरात्री, माघ गुप्त नवरात्री आणि आषाढ गुप्त नवरात्री अशा चार नवरात्री असतात. या काळात अनेक लोक 9 दिवस उपवास असतात. शास्त्रानूसार नवरात्रीचे हे उपवास इतर उपवासापेक्षा वेगळे असतात. त्याचे काही नियम असतात. 

उपवासाला बटाटा, बीट, साबुदाणा हे पदार्थ चालतात. पण रताळ्यासारखाच असलेले गाजर उपवासाला चालत नाही असे का?. उपवासाला काय चालतं आणि काय नाही हे कोणी ठरवलं आहे, असा प्रश्न कधीतरी तूम्हालाही पडला असेल ना. आज याच प्रश्नांची उत्तरे पाहुयात.   

उपवासाला रताळे चालते, पण गाजर चालत नाही. का तर म्हणे ते उलठ्या देठाचे असते. राजगिरा किंवा भगर चालते, पण तांदूळ चालत नाही. कुणाला कढीपत्ता चालतो, तर कुणी मस्तपैकी कोथिंबीरीची फोडणी साबुदाण्याला शुद्ध तुपात देतो.

साबुदाणा आला कुठून? तो तर विदेशी. पण उपवासाला चालणार्‍या यादीत त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर. त्याची उलाढालही मोठी. हरतालिकेच्या उपवासाला माता पार्वतीने कंदमुळे खाल्ली असे सांगितले जाते.

तसे पाहता आपल्यालाही काही कंदमुळे चालतात तर काही नाही. वास्तव असे की, माता पार्वतीचे वास्तव्य जंगलात होते. तिथे मिळेल ते खाऊन त्यांनी उपवास केला. पण आपण मात्र, विशिष्ट पदार्थच खाल्ला पाहिजे असे ठरवले.

पिढ्यांपिढ्या उपवासांच्या पदार्थांत बदल होत गेले. पूर्वीच्या काळी लोक फक्त फळ खायचे. कारण तेव्हा साबुदाना मिळत नव्हता. पोर्तुगीज जेव्हा भारतात आले तेव्हा आपल्याला साबूदाणा मिळाला. आपल्या पुराणात उल्लेख नसलेला साबुदाणा परदेशात अनेक दिवसांपासून खाल्ला जातो.

साबूदाणा बनतो ते टॅपिओका झाड मुळचे दक्षिण अमेरिकेचे. याच्याच कंदापासून साबुदाणे बनवले जातात. साबुदाण्याचा पहिला उल्लेख १२२५ मध्ये , झाओ रुकोव यांच्या “झू फॅन झीही “, या पुस्तकात आढळतो. या पुस्तकात त्यांने विविध देश आणि त्यांचे विशिष्ट अन्नपदार्थ यांचे वर्णन केले आहे. यात तो ब्रुनेई मध्ये १२व्या शतकात साबुदाणा वापरला गेल्याची नोंद करताना दिसतो.

उपवास कसा करावा

आपल्या धार्मिक, पौराणिक ग्रंथांमध्ये उपवासाचे दाखले सापडत असले तरी उपवासाला कुठला आहार घ्यावा, याबाबतचे संदर्भ उपलब्ध नाहीत. आपल्या पौराणिक ग्रंथात सांगितले जाते की, एकभुक्त म्हणजे एकदा जेऊन केलेला उपवास होय.

सूर्यास्तानंतर नक्षत्रं दिसू लागली की भोजन करणे  नक्तभोजन तसेच अहोरात्र केलेल्या उपवासाला संपूर्ण उपवास म्हटले जाते. प्राचीन ग्रंथांत एकादशी, शिवरात्र, जन्माष्टमी, रामनवमी, हरतालिका या उपवासांचे असे उल्लेख आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपवासाला काय आहार घ्यावा, या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख नसला तरी अंजन,गंध,पुष्प, अलंकार, दंतधावन, गात्राभ्यंग, तांबूल (विडा), दिवसा झोप, मैथुन, अक्षक्रीडा, अतिजलपान या गोष्टी वर्ज्य कराव्यात, असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Latest Marathi Update Live: विदर्भातील पाचही विधान परिषद जागांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT