Chanakya Niti
Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti : नवरा-बायकोचं नातं खराब करू शकतात 'या' दोन चुकीच्या सवयी; वाचा, चाणक्य नीति काय सांगते...

सकाळ डिजिटल टीम

नवरा बायकोचं नातं हे खूप पवित्र नातं मानले जाते. यात प्रेम, काळजी असते सोबतच छोटीमोठी भांडणेही या नात्यात होत असतात पण तरीसुद्धा नवरा बायको नेहमी एकमेकांशिवाय अपूर्ण असतात पण तुम्हाला माहिती आहे का चाणक्य नितिनुसार दोन चुकीच्या सवयी नवरा बायकोचं नातं खराब करू शकतात. त्या सवयी कोणत्या? (Chanakya Niti these two habits make worst your husband wife relation read story)

चाणक्य नितीनुसार खालील दोन चुकीच्या सवयी नवरा बायकोचं नातं खराब करू शकतात. त्यामुळे या सवयींना लवकरात लवकर सोडून दिलेले कधीही चांगले असते. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

राग

  • असं म्हणतात राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. रागामुळे अनेकदा व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागतो.

  • आचार्य चाणक्य सांगतात की जर दांपत्याच्या जीवनात नेहमी आनंद हवा असेल तर नात्यात कधीच राग मध्ये येऊ नये कारण रागामुळे नवरा बायकोचं नातं खराब होऊ शकतं

  • अनेकदा रागाच्याभरात तुम्ही चुकीचे निर्णय घेता. रागात असताना काय चुकीचं आहे काय योग्य आहे, यातला फरक समजत नाही. पति-पत्नीच्या नात्यात राग कधीच येऊ नये, याची काळजी घ्यावी.

  • जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरुन राग येत असेल तर रागाला शांत करा आणि राग कमी झाल्यावर एका ठिकाणी बसून गैरसमज दूर करा.

फसवणूक

  • मुळात नात्यात कधीच फसवणूकीला जागा नकोय. विशेष म्हणजे नवरा बायकोच्या नात्यात तर कधीच फसवणूक करायला नको कारण हे नातं विश्वासावर अवलंबून असतं.

  • दोन अनोळखी माणसं केवळ एकमेकांना विश्वासात घेऊन एकमेकांसोबत आयुष्यभर सोबत राहण्याचं ठरवतात.अशात या नात्यात फसवणूक झाली तर नातं फार काळ टिकत नाही.

  • फसवणूक करणारा व्यक्ती कधीच आपल्या नात्याचा आदर करत नाही आणि स्वत:ला योग्य समजवण्यासाठी वारंवार खोटं बोलतो.

  • चाणक्य नितीनुसार प्रेम आणि विश्वास नवरा बायकोच्या नात्याला मजबूकत करतात तर फसवणूक झटक्यात हे नातं संपवून टाकते किंवा बिघडून टाकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT