समस्या झोपेत बडबडण्याची Esakal
लाइफस्टाइल

तुमचं मुलंही झोपेत बडबडतं? Sleep Talking ही समस्या आहे का? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं

खास करून गाढ झोपेमध्ये लहान मुलं बोलतात. यामागे अनेक कारणं असतात. काही वेळा आई-वडिलांना असलेली झोपेत बोलण्याची सवय मुलांमध्येही दिसू शकते म्हणजेच याला अनुवांशिक कारण असू शकतं

Kirti Wadkar

लहान मुलांमध्ये त्यांच्या वाढत्या वयानुसार सवयी बदलताना दिसत असताता. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल कि लहान मुलं झोपेमध्ये Sleep बडबडतात. काही मुलं स्पष्ट काहीतरी बोलतात तर काही मुलांची बडबड नेमकी काय आहे हे कळून येतं नाही. Child Care Tips in Marathi Know about Sleep Talking Habits in Children

अनेकदा मध्यरात्री किंवा गाढ झोपेत मुलं अचानक बोलू लागल्याने Sleep Talking ते भितीदायक वाटतं. मात्र ही एक सामान्य समस्या Common Problem आहे. खास करून पुरुषांमध्ये आणि लहान मुलांमध्ये झोपेत बडबडण्याची समस्या दिसून येते.

साधारण ३ ते १२ वर्षांपर्यंतची लहान मुलं झोपेमध्ये बोलतात किंवा काहीतरी बडबडतात. तसंच काही मुलं झोपेत हसतात किंवा रडतातही. अनेकदा सलग काही दिवस मुलं झोपेत बोलत असेल तर पालकांची चिंता वाढते. मात्र मुलांचं झोपेमध्ये बोलणं ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. याचा मुलांच्या शारीरीक किंवा मानसिक विकासावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नसतो.

मुलं झोपेत का बोलतात?

खास करून गाढ झोपेमध्ये लहान मुलं बोलतात. यामागे अनेक कारणं असतात. काही वेळा आई-वडिलांना असलेली झोपेत बोलण्याची सवय मुलांमध्येही दिसू शकते म्हणजेच याला अनुवांशिक कारण असू शकतं.

काही वेळेस मुलांना ताप आला असल्यास किंवा ती आजारी असल्यासही झोपेत बडबड करतात. तसंच एखाद्या ठराविक वयामध्ये किंवा काळामध्ये मुलं हट्ट करू लागतात. एखाद्या वस्तूसाठी किंवा गोष्टीसाठी ते आई-वडिलांकडे सतत हट्ट धरतात कारण त्यांना प्रकर्षाने ती वस्तू हवी असते. अशा वेळीदेखील मुलं झोपेत बोलू शकतात.

यासोबतच काहीवेळेस एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असल्यास किंवा कुटुंबासोबत पिकनिकवरून आल्यावर उत्सुकता, आनंदा अशा भावनांमुळे मुलं झोपेत बोलू शकतात. तर काही वेळेस स्लीप सायकल खराब झाल्याने म्हणजेच झोप व्यवस्थित पूर्ण होत नसल्याने ते झोपेत बडबड करू शकतात.

झोपेत बोलण्याचा आरोग्यावर परिणाम होतो का?

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची कायम चिंता असते. मुलांमधील छोट्या-मोठ्या बदलांकडे, त्यांच्या वागण्याकडे पालकांचं लक्ष असतं. अशावेळी मुलं झोपेत बोलू लागली तर काही पालकांची चिंता वाढू लागते. मात्र यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण झोपेत बोलण्याचा मुलांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसतो.

हे देखिल वाचा-

हे उपाय करू शकता

मुलं झोपेत बोलत असतील तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता.

लहान मुलांना मोठ्यांपेक्षा थोड्या जास्त वेळ झोपेची आवश्यकता असते. यासाठी सर्वप्रथम मुलांना लवकर झोपण्याची सवय लावा. लहान मुलांना किमान ८-१० तासांची झोप गरजेची असते.

शिवाय मुलं झोपी गेल्यानंतर लाइट, आवाज किंवा इतर गोष्टींमुळे त्यांची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या.

मुलांना रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाण्यास देऊ नका. तसंच चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि आईस्क्रिम असे पदार्थ देणं टाळा.

मुलं रात्री झोपेत बोलू लागल्यास त्याला उठवू नका. तर त्याला शांत करून पुन्हा झोपवा.

झोपण्यापूर्वी मुलांना एक कप कोमट दूध पिण्यास द्या.

मुलांच्या झोपेत बोलण्याकडे दया लक्ष

जर तुमचं मुलं झोपेत सतत रागात किंवा दु:खी होवून तसंच रडत बोलत असल्याचं तुम्हाला जाणवल्यास दुसऱ्या दिवशी त्याच्याशी गप्पा मारू त्याला कोणती अडचण तर नाही ना हे जाणून घ्या. यामुळे मुलांचा ताणं कमी होईल.

तसंच संध्याकाळी मुलांना काही खेळ खेण्यासाठी वेळ द्या. मुलांना मैदानी खेळ खेळणं आणि ते सक्रिय राहणं गरजेचं आहे.

तसंच रात्री त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांना एखादी गोष्ट सांगावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT