Destination Wedding esakal
लाइफस्टाइल

Destination Wedding :  डेस्टीनेशन वेडींग आता तुमच्या आवाक्यात, असं करा बजेटवालं स्वप्नातलं लग्न

डेस्टिनेशन वेडिंगसाठी आवडते ठिकाण कुठे आहे?

Pooja Karande-Kadam

Destination Wedding : पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की ‘लग्न पहावे करून’ हे अत्यंत खरं आहे. पूर्वीच्या काळापासून आजवर लग्नासारख्या सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पूर्वी लग्न अगदी धुमधडाक्यात व्हायची. पाण्यासारखा पैसा खर्च केला जात होता. तर, आत्ता ही संस्कृती बदलत चालली आहे.

पूर्वी हजार दोन हजार पंगती उठून लग्न व्हायची. पण आता काही मोजक्याच लोकांमध्ये लग्न उरकली जातात. पूर्वी घरी नंतर एखाद्या सांस्कृतिक कार्यालयात लग्न पार पडली. पण आताचा जमाना डेस्टीनेशन वेडींगचा आहे. लोक घरी, कार्यालयात न जाता रम्य बिचेस, रिसॉर्ट याठिकाणी लग्न करतात.

भारतात डेस्टिनेशन वेडिंगला पुन्हा एकदा वेग आला आहे. लोक आपल्या आवडीच्या ठिकाणी शाही विवाह सोहळे करतात. काहींनी देश-विदेशातही लग्न केले आहे. यामध्ये लक्झरी डेस्टिनेशनपासून बजेट डेस्टिनेशन्सपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंगबद्दल काही खास माहिती सांगत आहोत.

कोविड नंतर बदल दिसून आलाय

आग्रा येथील ताज हॉटेल्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक परितोष लधानी म्हणतात की, कोरोनानंतर आता बरेच बदल दिसून येत आहेत. एवढेच नाही तर आता हिवाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगची तयारी सुरू झाली आहे. लोकांनी लग्नाशी संबंधित सेवांसाठी वेडिंग प्लॅनर, हॉटेल्स, रूम्स आणि तज्ञांचे बुकिंग आधीच सुरू केले आहे.

बदल फक्त महानगरांमध्येच होत नाही

बदल केवळ महानगरांमध्येच नाही तर छोट्या शहरांमध्येही दिसून येतो. त्याला फक्त शहरातूनच नाही तर खेड्यापाड्यातूनही बुकिंग मिळते. आता लोक मर्यादित किंवा निवडक पाहुण्यांना आमंत्रित करतात आणि लग्न करत आहेत. बहुतेक विवाहांमध्ये पाहुण्यांची संख्या 100 ते 150 पर्यंत असते. अशा परिस्थितीत 25 ते 35 खोल्या बुक केल्यानंतरच लग्न होते.

डेस्टिनेशन वेडिंग कुठे होतात?

डेस्टिनेशन वेडिंगमध्ये जास्तीत जास्त खर्च कुठे होतो, असे विचारले असता परितोष सांगतात की, हॉटेलमधील रुम बुकिंग, पाहुण्यांसाठी जेवण आणि त्यांच्या प्रवासावर ५० ते ६० टक्के रक्कम खर्च होते. त्यानंतर सजावटीचा खर्च येतो. सजावटीत खऱ्या फुलांचा अधिक वापर केल्यास किंमत आणखी वाढेल.

10 ते 15 टक्के पैसे डीजे, कोरिओग्राफर, कलाकार इत्यादी लग्नाच्या मनोरंजनावरही खर्च केली जाते. लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवरही चांगला पैसा खर्च होतो. जर तुम्ही वेडिंग प्लॅनरची सेवा घेतली असेल तर त्यांची फी देखील बजेटच्या पाच ते सात टक्के असेल.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी आवडते ठिकाण कुठे आहे?

ज्या लोकांना खूप पैसा खर्च करायचा आहे ते जवळच्या देशांमध्ये जातात. आजकाल दुबई, अबुधाबी, कतार, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया या ठिकाणांना पसंती आहे. ज्यांना देशात आलिशान लग्न करायचे आहे, ते राजवाड्यात किंवा किल्ल्यात लग्न करतात.

लोकांना उदयपूर, जयपूर, गोवा, केरळ इत्यादी ठिकाणे आवडतात. कलिमपोंड, वायनाड, धर्मशाला, आग्रा ही ठिकाणे कमी बजेट असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी किती खर्च येतो?

तुम्हीही डेस्टिनेशन वेडिंगचा विचार करत असाल तर सर्वात आधी बजेट लक्षात ठेवा. जर तुम्हाला सर्वात कमी बजेट डेस्टिनेशन वेडिंग करायचे असेल, तर एक दिवसाच्या लग्नासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येईल तर दोन दिवसांच्या लग्नासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च येईल. आलिशान लग्न असेल तर करोडो रुपये खर्च होतात.

घरापासूनचे अंतर सर्वात महत्त्वाचे आहे

तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगचे ठिकाणही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही दिल्लीचे असाल, तर केरळ, गोवा किंवा उदयपूर सारखे ठिकाण निवडले तर वाहतुकीचा खर्च वाढेल. कारण, तिथे तुम्ही पाहुण्यांना विमानाने न्यावे लागेल. आजकाल विमानाच्या तिकीट दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.

त्याऐवजी जयपूर, आग्रा किंवा अलवर, भरतपूर इत्यादी ठिकाणे निवडल्यास हा प्रवास रस्त्याने होईल. त्यामुळे प्रवासखर्चात बचत होईल. येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ग्रूप जितका लहान असेल तितका त्यांचा प्रवास व्यवस्थापित करणे सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT