Homemade Hair Dye
Homemade Hair Dye esakal
लाइफस्टाइल

Hair Dye: अरेरे! केस हायलाइट करण्याच्या वयात पांढरे केस लपवावे लागता आहेत? मग आधी हे वाचाच...

Lina Joshi

Homemade Hair Dye: वाढत्या वयानुसार केस पांढरे होणं वैगरे ठिके पण इथे वय एवढस असतं पण केस मात्र पांढरे होतात. अगदी 20-25 वर्षांच्या मुला-मुलींना हा प्रॉब्लेम असल्याचे आढळून आले आहे. अशात वाढत्या वयानुसार केसांची अजून काळजी घेणे गरजेचे आहे.

अशा स्थितीत जर तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या डाय किंवा कलरने काळे केले तर त्यांच्या नैसर्गिक आरोग्यावर झपाट्याने परिणाम होऊन ते कमकुवत होऊन गळू लागतात.

म्हणूनच नैसर्गिक घटकांच्या मदतीने आपले केस घरी रंगविणे आणि त्यांना निरोगी आणि चमकदार बनवणे हा सर्वोत्तम उपाय आहे.म्हणूनच घरातल्या घरात अगदी 10 मिनिटात आपले केस नैसर्गिक दृष्ट्या कलर करा म्हणजे तुमच कामही होईल, वेळही वाचेल आणि पैसाही.

होममेड हेअर डायसाठी साहित्य (ingredients for homemade hair dye)

- 2 टीस्पून कडुलिंब पावडर

- 2 चमचे मेहेंदी पावडर

- 2 चमचे कॉफी पावडर

- 4 चमचे कलोंजी 

- 2 चमचे बडीशेप

- 2 चमचे आवळा पल्प किंवा रस

- एक लोखंडी पॅन

- आवश्यकतेनुसार पाणी

अशा प्रकारे केसांचा रंग बनवा (way to colur your hair with homemade hair dye)

सर्वात आधी एक लोखंडी तवा घेऊन गॅसवर ठेवा.

आता पॅनमध्ये दोन चमचे बडीशेप टाका आणि तळून घ्या.

आता ते थंड करून चांगले बारीक करून पावडर बनवा.

आता कढईत कलोंजी पावडर, आवळा पावडर, मेहेंदी पावडर, कॉफी पावडर इत्यादी सर्व गोष्टी एकत्र करून गॅस चालू करा.

आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान उकळून घ्या. 

आता थंड करुन 2-3 तास भिजत ठेवा. 

आता केसांना लावून केस तसेच दीड तासासाठी ठेवून द्या आणि मग कोमट पाण्याने केस धुवून टाका. 

बाजारात उपलब्ध हेअर डायचे तोटे

दम्याचा त्रास असलेल्यांनी हेअर डाय वापरणे टाळावे कारण त्यात असलेले पर्सल्फेट नावाचे रसायन दम्याची समस्या वाढवू शकते. याशिवाय त्यात अशी अनेक रसायने आहेत, ज्याचा वास श्वसनाचा त्रास वाढवू शकतो.

ज्या लोकांनी हेअर डाय केला आहे त्यांच्यावर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की त्यांच्यामध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत.

हेअर डायमध्ये अमोनिया असते, जे आपल्या केसांसाठी खूप हानिकारक आहे. यामुळे केस गळणे आणि केस तुटणे सुरू होते आणि केस कमजोर होतात.

हेअर डाय करतांना त्वचेला लागलेली मेहेंदी कशी काढायची?

हेअर डाय करतांना बाकी काही होवो वा ना होवो तो हेअर डाय आपल्या त्वचेला नक्की लागतो. कुठे कानाच्या पाळीला किंवा कपाळाला किंवा मानेला नाहीतर हातांना तरी हमखास. आणि मग जवळजवळ 4-5 दिवस हे डाग निघत नाही अशात हे उपाय तुम्हाला मदत करतील. 

1. मिठाच्या पाण्यात भिजवा

जर हाताला मेहेंदी लागली असेल तर कोमट पाणी घ्या त्यात मीठ टाका आणि त्यात आपले हात टाकून जरा वेळ ठेवा. साधारण 20 मिनिटांनी हात काढून घ्या. मेहेंदी पूर्णपणे निघून जाईल. 

मीठामध्ये असलेल्या एक्सफोलिएटिंग एजंटने हे काम होते शिवाय मिठातील सोडियम क्लोराईड तुमच्या त्वचेच्या पेशींचे पोषण करण्यास आणि मृत पेशींपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

2. ऑलिव्ह ऑइल आणि मीठ

एक कप ऑलिव्ह ऑइलमध्ये तीन किंवा चार चमचे समुद्री मीठ मिसळल्याने एक मिश्रण तयार होते हे मिश्रण सुद्धा तुम्ही आपल्या त्वचेवर लावू शकतात. याची छान मसाज करा आणि मग कापसाने पुसून काढा आणि मग ओल्या कापडाने पुसून घ्या. 

3. हेअर कंडिशनर

केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी हेअर कंडिशनर कामाच आहेच पण त्याच सोबत त्वचेवरुन मेहेंदी काढण्यासाठी देखील मदत करते. त्या पॅच वर कंडिशनर लावा आणि तुमच्या त्वचेला ते पूर्णपणे शोषून घेण्यासाठी वेळ आहे याची खात्री करा. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

4. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

अर्धा कप कोमट पाण्यात, 1 चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे लिंबाचा रस टाका. हे मिश्रण कापसाच्या बोळयाला लावा आणि त्वचेवर मसाज करा. जरावेळात रंग निघू लागेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT