Dussehra 2023 esakal
लाइफस्टाइल

Dussehra 2023 : सोनं घ्या सोन्यासारखं रहा! दसऱ्याला आपट्याची पाने का वाटली जातात?

आपट्याची पाने वाटण्यामागील पौराणिक कथा काय आहे?

Pooja Karande-Kadam

Dussehra 2023 : दरवर्षी शारदीय नवरात्रीमध्ये, माता देवी आदिशक्ती देवी दुर्गा यांच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच नऊ दिवस उपवास केला जातो. अश्विन शुद्ध दशमीचा दिवस म्हणजे विजयादशमी- दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्यावर देवीचे नवरात्र साजरे केले जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. याला विजयादशमी असेही म्हणतात. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

त्रेतायुगात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केल्याचे सनातन धर्मग्रंथात नमूद आहे. त्यावेळी भगवान श्रीरामांनी वानरसेनेच्या मदतीने लंकेवर आक्रमण केले होते. याच काळात भगवान श्रीराम आणि रावण राजा यांच्यात युद्ध झाले. या युद्धात भगवान श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा पराभव करून लंकेवर विजय मिळवला.

याच युद्धात भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त केले. त्यामुळे दरवर्षी अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या शुभप्रसंगी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात. पण दसऱ्याला सोन्याची पाने का वाटली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? चला, त्याबद्दल जाणून घेऊया-

हिंदू शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की, भगवान श्रीरामांनी लंका जिंकण्यापूर्वी भगवान शिव आणि शनिदेव यांना प्रिय असलेल्या शमी वृक्षाची पूजा केली होती. यावेळी त्यांनी विजयश्री मिळविण्यासाठी शमीच्या झाडाचे वरदानही मागितले होते. शमीच्या झाडाची पूजा करून आणि शमीच्या पानाला स्पर्श केल्याने भगवान श्री रामाने विजय मिळवला अशी धार्मिक श्रद्धा आहे. (Dussehra 2023)

पौराणिक कथा

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते.

धार्मिक शास्त्रात वर्णन आहे की शमीच्या झाडामध्ये कुबेर देव, वृक्षात धनाची देवता वास करते. त्यामुळे शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तसेच उत्पन्न, आनंद आणि वय वाढते. यासाठी लोक दर शनिवारी शमीच्या झाडाची पूजा करतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची पाने म्हणजेच शमीच्या पानांचे वाटप केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्यामध्ये अपार वाढ होते.

यामुळेच लोक एकमेकांना सोन्याची पाने वाटतात. सध्या शमीच्या झाडाच्या पानांचा तुटवडा आहे. यासाठी आजकाल शमीच्या पानांच्या जागी अस्तराची पाने वाटली जातात. हे सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT