fight with your partner esakal
लाइफस्टाइल

जोडीदाराशी भांडण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

भांडण्यादरम्यानचा तुमचा प्रतिसाद नातेसंबंधावर दिर्घकालीन परिणाम करतो

सकाळ डिजिटल टीम

नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम असणे महत्वाचे असते. प्रेम असेल तर दोघांचे बंध मजबूत होण्यासाठी त्याचा फायदा होतो. पण फक्त प्रेमच (Love) तुमचे नाते मजबूत करण्यासाठी पुरेसे नसते. दोघांच्यात आदर, सहानुभूती, समजूतदारपणा, दोघांनी एकमेकांचे म्हणणे एेकून घेणे किंबहुना चांगला श्रोता असणे या गोष्टी काही जसजसा वेळ जातो तसे जोडीदारासोबत (Partner) बंध मजबूत करण्यासाठी मदत करू शकतात. पण, भांडणादरम्यान तुमचा प्रतिसाद कसा असतो त्यावरून तुमच्या नात्यातील (Relation) दीर्घकालीन व्यवहार्यतेवर परिणाम होऊ शकतो.

Couple

भांडण्यादरम्यानचा तुमचा प्रतिसाद नातेसंबंधावर (Relationship) दिर्घकालीन परिणाम करतो. मानसशास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ निकोल लेपेरा, यांनी Instagram पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की चांगला संवाद (Communication) साधून तुम्ही तुमचे नाते निरोगी आणि मजबूत करू शकतो. दोघांच्या नात्यात अविश्वसनीय प्रमाणात प्रेम असू शकते. पण दोघांना नेमके काय हवे आहे किंवा त्यांना काय वाटते याबाबत योग्य संवाद कसा साधायचा हेच अनेकांना माहिती नसल्याने नातेसंबध बिघडतात. परिणामी एकमेकांवर नाराज होण्याचे प्रमाण वाढते. बेपर्वा वृत्ती, व्यसने, घरगुती अत्याचार, कौटुंबिक समस्या, विसंगती ही नातेसंबंध संपुष्टात येण्यामागची प्रमुख कारणे असली तरी, अनेकदा योग्य संवाद नसल्यानेच अनेग अडचणी येतात. अनेक नातेसंबंध केवळ एकमेकांशी योग्य संवाद नसल्यामुळे संपतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.

couple arguments

संघर्ष टाळल्याने तुमचे नाते का नष्ट होऊ शकते? (Why avoiding conflict could be silently killing your relationship)

अनेकांना संघर्ष नको असतो. आम्ही त्याऐवजी गोष्टी झाकून ठेवण्याकडे किंवा त्या न बोलण्याकडेच अनेकांचा कल असतो. संघर्षांकडे दुर्लक्ष करण्याची तुमची प्रवृत्ती असू शकते. कारण आपल्यापैकी बरेच लोक अशा घरात वाढले आहेत जिथे प्रौढ लोक एकमेकांना दोष देतात किंवा टीका तरी करतात. मात्र अनेक लोकांना आपण संघर्ष टाळताना पाहिले आहे, असे डॉ लेपेरा म्हणतात. संघर्ष करणे चुकीचे आहे हे आपल्याला घरातून शिकवले जाते. त्यामुळे संघर्ष केल्याने एखाद्याला गमावण्याची भिती आपल्याला वाटते, असे तज्ज्ञ सांगतात. पण नातेसंबंधात संघर्ष करणे किंवा वाद घालणे हा जीवनाचा भाग आहे. किंबहुना तुमचे नाते निरोगी ठेवायचे असेल, तर हा उत्तम मार्ग आहे. मात्र संघर्ष करताना किंवा वाद घालताना तुमचे संभाषण कौशल्य चांगले असणे किंबहुना ते तसे आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा संघर्षामुळे तुमचे भावनिक संबंध अधिक गहिरे होऊ शकतात.

couple

जोडीदारासोबत भांडण्यासाठी अशा आहेत टिप्स

1. तुमच्या जोडीदाराचा दृष्टीकोन हस्तक्षेप न करता किंवा तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोन सांगण्याची घाई न करता त्याचे म्हणणे पूर्णपणे समजून घ्या.

2. तुमचे मुद्दे मांडताना योग्य आधार असू द्या.

3. संघर्षावर चर्चा करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची भावनिक अवस्था योद्य आहे का ते विचारा किंवा ते पडताळून पाहा

4. तुमच्या जोडीदाराचे अनुभव एेकण्यासाठी उत्सुकता दाखवा.

5. तुम्ही कधी नर्व्हस होता हे जाणून घ्या आणि बोलताना मध्येच ब्रेक घ्या.

6. तुम्ही हे केले किंवा तुला हे वाटले ऐवजी फक्त मला वाटले असे बोला.

7. वाद-विवाद सुरू असताना समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटू द्या. आक्रमक होऊ नका, ओरडू नका, गोष्टींची निंदा करू नका, अपमान करू नका किंवा समोरच्या व्यक्तीला लाज वाटेल असे बोलू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT