Hair Care Routine esakal
लाइफस्टाइल

Hair Care Routine : २४ तास केसांचा आंबाडा घालण्याची सवय महागात पडेल, का ते वाचा

सतत केस बांधून ठेवणं केसांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं की वाईट

Pooja Karande-Kadam

Hair Care Routine :

सगळ्याच मुलींना एक सवय लागलीय. कोणताही प्रसंग असो, एखादा कार्यक्रम वा प्रवास त्यांचे केस नेहमी वर टांगलेले असतात. थोडक्यात सतत डोक्यावर आंबाड्याचं ओझं असतच. काहींना मोकळे केस आवडत नाहीत म्हणून तर काहींना केसांची अडचण होते म्हणून ते वर बांधलेले असतात.

पण सतत केस बांधून ठेवणं केसांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं की वाईट. हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नाही ना. तर मग एकदा विचार करून बघा की केस बांधल्याने मोकळं आरामदायक वाटत असलं तरी ते केसांसाठी हानिकारक ठरू शकते.

आंबाडा सुरूवातीला चांगला वाटत असला तरी एका विशिष्ट काळानंतर त्याची सवय होऊन जाते. पण ही सवय महिलांच्या केसांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरते. कशी ते पाहू.

केसांची वाढ खुंटते

केस सतत बांधून ठेवल्याने केसांची वाढ खुंटते. होय, ज्यांना त्यांचे केस लांबसडक व्हावेत असं वाटतं त्यांच्यासाठी केस बांधणे हानिकारक ठरू शकतं. कारण, केस सतत बांधून ठेवल्याने केस वाढणे बंद होते.

केस कमकुवत होतात

सतत केस बांधल्याने केस सतत ताणले जातात. त्यामुळे केस ताणून कमकुवत होतात. कमकुवत केस तुटतात आणि विरळ होऊ लागतात आणि केस दाट होत नाहीत.

सतत केस ताणले जातात आणि तुटतात

डोकेदुखी वाढते

अंबाडा नेहमी बांधून ठेवल्याने डोक्यावर एकाच ठिकाणी दाब पडतो. ज्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. काळजी न घेतल्यास त्याचे रूपांतर मायग्रेनमध्येही होऊ शकते.

कपाळ मोठे होते

अंबाडा सतत खेचून आणि बांधून ठेवल्याने केसांची मुळे समोरून मागे सरकतात. कपाळ मोठे दिसायला लागते. तसेच केस गळल्यामुळे केस पातळ होतात, ज्यामुळे चेहराही मोठा दिसायला लागतो. (Hair Care Tips)

नसांवर ताण येऊ शकतो.

आंबाडा घालून महिला स्वयंपाकघरातील काम, धावपळ,प्रवास इत्यादी अनेक प्रकारची कामे सहज करू शकतात. पण या आंबाड्यासोबतच संसर्ग आणि कोंडा येऊ शकतो. कारण आंबाड्यामुळे बराच वेळ काम केल्याने घाम आणि धूळ आंबाड्यात सहज बसते. ज्यामुळे स्वच्छतेवर परिणाम होतो आणि संसर्ग होण्याची भीती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT