Happy Daughters Day sakal
लाइफस्टाइल

Daughters Day : मुलीला द्या कन्या दिवसाच्या हटके शुभेच्छा, इथे वाचा एकापेक्षा एक भारी मेसेज

जर तुम्हाला आपल्या मुलीला कन्या दिवसाच्या काही हटके शुभेच्छा द्यायच्या असेल तर खालील हटके शुभेच्छांची लिस्ट जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Daughters Day : आज जागतिक कन्या दिवस. जगभरात वेगवेगळ्या तारखांना कन्या दिवस साजरा केला जातो पण भारतात २४ सप्टेंबरला जागतिक कन्या दिवस साजरा केला जातो. समाजात स्त्रियांना एक विशेष स्थान आणि आदर आहे. त्या वेगवेगळ्या भूमिका निभवत असतात. कधी आई तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी मुलगी. प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. यात विशेष म्हणजे कन्येचं एक वेगळं स्थान आहे. याच कन्येच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो.

जर तुम्हालाही तुमच्या मुलीला कन्या दिवसाच्या काही हटके शुभेच्छा द्यायच्या असेल तर खालील हटके शुभेच्छांची लिस्ट जाणून घ्या. (Happy Daughters Day)

1. मुलगी म्हणजे आनंद

मुलगी म्हणजे चैतन्य

मुलगी म्हणजे ज्योती मुलगी

म्हणजे सौख्याच औक्षण…

जागतिक कन्या दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

2. लक्ष्मीच्या पावलांनी जी घरात येते

जिच्या पैंजनांनी सारे घर निनादते

जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते

हे सर्व सुख त्याच्याच नशिबी येते

ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते

जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा

4. लेक म्हणजे ईश्वराची देणं,
लेक म्हणजे अमृताचे बोल,
तिच्या पाऊलखुणांनी,
सुख ही होई अनमोल.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

5. छोटी छकुली अशी असावी
प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

6. कुणाची ती बहिण असते,
कुणाची ती आई असते,
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते,
पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

7. पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते,
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते.
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

8. लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

9. हॅपी डॉटर्स डे डीअर,
तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि
मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस.

10. माझी लेक माझी सखी,
परमेश्वराकडे एकच मागणं,
कधी नको होऊस तू दुःखी.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा (Daughters Day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT