Health Tips esakal
लाइफस्टाइल

Health Tips : शरीरात दिसत असतील ही लक्षणे तर समजून जा की तुमची किडनी...

ही लक्षणे असलेल्या लोकांनी व्यसनांपासून रहावं दूर

Pooja Karande-Kadam

Health Tips :

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत. मधुमेह, बीपी यांचे रूग्ण वाढत आहेत. अशातच आता किडनीच्या विकारांनी बळी जाण्याची संख्याही वाढत आहे. डॉक्टरांच्या मते, या आजाराची वेळीच ओळख करून त्यावर उपचार सुरू केल्यास रुग्णाचे आयुष्य वाढू शकते.

बदलत्या जीवनशैलीत लोक फॅशन, लाइफस्टाईलकडे लक्ष देत आहेत. पण ते काय खातात, त्यामुळे आरोग्याला किती नुकसान होते. याकडे ते लक्ष देत नाहीत. लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्यांच्या इच्छेनुसार नाही तर त्यांच्या आरोग्यानुसार लक्ष देणे आवश्यक आहे.

काही लोकांना किडनीशी संबंधित समस्यांचाही सामना करावा लागला.  अशातच तुम्हाला किडनी निकामी होण्याशी संबंधित लक्षणे कशी असतात. त्याची सुरूवात कशी होते याबद्दल जाणून घेऊयात.

ही लक्षणे ओळखा

अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, जेव्हा 80 टक्के लोकांच्या किडनी खराब झाल्या आहेत, तेव्हा त्यांना याची जाणीव होते. पायांना सूज येणे, अशक्तपणा, शरीरात खाज येणे, भूक न लागणे, उलट्या झाल्यासारखे वाटणे ही मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.  

जर एखाद्या व्यक्तीला अशी समस्या येत असेल तर त्याने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अशी लक्षणे दिसत असतील तर...

किडनी निरोगी ठेवण्यासाठी लोकांनी सर्वप्रथम आपल्या खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आणि जर मद्यपानाची सवय असेल तर ती सवय सोडून देणे आवश्यक आहे. यासोबतच दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांना ते नियंत्रणात ठेवावे लागते. लोकांनी वर्षातून एकदा तरी त्यांच्या किडनीची तपासणी करून घ्यावी. त्यांनी सांगितले की दारू पिणाऱ्या लोकांची किडनी झपाट्याने बिघडते, त्यामुळे लोकांनी दारू पिणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

Maharashtra Live News : देऊळगाव राजा मधील दोन बड्या मसाला व्यावसायिकांवर एफडीएची धडक कारवाई, एक कोटींचा माल जप्त

Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

SCROLL FOR NEXT