break from relation
break from relation 
लाइफस्टाइल

ब्रेकअप ऐवजी ब्रेक घ्या; नात्याला वेळ द्या!

सकाळ डिजिटल टीम

काहीवेळा आपण आपल्या नात्यात इतके अडकतो कि स्वत:ची ओळख हरवून बसतो. सगळं काही त्याच्या-तिच्या मनानं केलं जातं. आयुष्यात जेव्हा वेगळे प्रसंग येतात तेव्हा तुमचे काही निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतात. अशावेळी आपण साधे निर्णय घेताना जोडीदारावर (Partner) अवलंबून आहोत असं वाटतं. मग काहीतरी चुकतयं असं लक्षात येतं.अशावेळी ब्रेकअप (Breakup) करण्यापेक्षा ब्रेक घेण्याने तुमचं नातं पुर्वीपेक्षा जास्त बहरू शकतं. ही गोष्ट समजणे जरा अवघड आहे पण तुम्ही प्रयत्न करू शकता. हा प्रकार तुमच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणे आहे. कंपनीत खूप तास काम केल्यानंतर तुम्हाला थोडा ब्रेक घेण्याचा सल्ला दिला जाता. कारण त्यानंतर तुम्ही अधिक जोमाने काम करणार असता. अशाचप्रकारे नातेसंबंधात ब्रेक घेतल्याने तुम्हाला दोघांना एकमेकांना समजून घेण्याची अधिक चांगली संधी मिळू शकते. पण हा ब्रेक कसा घ्याल हे खालील मुद्यांवरून ठरवा.

कधी गरज लागते ब्रेकची? - जेव्हा प्रेम असूनही नात्यात स्पार्क नसतो. जेव्हा काहीतरी कुठेतरी कमी आहे, असे वाटते. हे नाते आणखी पुढे नेऊ शकत नाही, असे वाटायला लागते तेव्हा ब्रेकअपपूर्वी एक छोटासा ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नातं तुटण्यापासून कदाचित वाचू शकतं.

women

स्वत:ला ओळखण्याची गरज- या नात्यात तुम्ही कुठेतरी हरवरला आहात असे वाटू लागल्यावर ब्रेक घेण्याची गरज वाटते. तुम्ही तुमच्या नात्यात इतके गुंतले आहात की तुम्ही प्रेमाशिवाय इतर गोष्टींचा विचार करूच शकत नाही. स्वत:ला पुन्हा सावरण्यासाठी, स्वत:ला ओळखण्यासाठी क्षमता विकसित करण्यासाठी एक ब्रेक गरजेचा असतो.

Couple

बोलणं कमी होऊ लागतं- खूप वर्ष एकत्र राहिल्याने तुम्हा दोघांच्यातला संवाद कमी झाला आहे का? असे असेल तर एकमेकांपासून काही काळ दूर राहून नात्याला वेळ द्या. यामुळे तुम्हा दोघांमधला हरवेला संवाद, नातं पुन्हा ताजं होऊ शकतं.

couple

जेव्हा भांडणं जास्त होतात- जेव्हा नात्यात प्रेमापेक्षा भांडण जास्त होतं तेव्हा एक ब्रेक घेणं चांगलं असतं. अशावेळी तुम्ही दोघांनी एकमेकांच्या संपर्कात अजिबात राहू नका. त्यामुळे कदाचित तुम्हाला नात्याचं महत्व कळेल. त्यानंतर तुम्ही तुमचं नातं पुन्हा नव्याने सुरू करू शकता. नात्याला पुन्हा संधी देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT