Holi 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi 2024 : हरभरा डाळ शिजतही नाही अन् पचतही नाही, तुरीच्या डाळीपासून बनवा मऊ,लुसलुशीत पुरणपोळ्या

ज्यांना पथ्याने हरभरा डाळ खायची नाही त्यांच्यासाठी हा हेल्दी ऑप्शन आहे

सकाळ डिजिटल टीम

Holi 2024 :

होळी रे होळी,पुरणाची पोळी! अशी आरोळी उद्या दिवसभर ऐकायला मिळेल. कारण, उद्या होळी आहे. भारतीय संस्कृतीत होळीला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, या दिवशी भक्त प्रल्हादांना मारणाऱ्या राक्षसीनी होलिकाचे पेटत्या होळीत दहन झाले. म्हणजेच सत्याचा विजय झाला. त्यामुळे होळी जल्लोषात साजरी केली जाते.

होळी दिवशी सायंकाळी किंवा सकाळी घरगुतू होळी रचली जाते. लाकडे, शेणकुटे यांची होळी जाळली जाते. या होळीत नारळ आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळी दिवशी पुरणाची पोळी करण्याची प्रथा आहे.

पण पुर्वापार पुरणाची पोळी ही हरभऱ्याच्या डाळीपासून करतता. पण, पुर्वीच्या लोकांना ती पचत होती. कारण, त्यांचे राहणीमान, कष्टाची कामे यामुळे पचायला जड असणारा हरभारा लोक सहज खात होते. पण आताच्या काळात पुरणपोळी बनवली तरी लोक नाक मुरडतात.

आमच्यात फक्त सकाळीच पोळी खातात. संध्याकाळी भाकरी,चपातीच लागते कारण हरभऱ्याची डाळ खाऊन त्रास होतो. अशा तक्रार तुमच्याही घरातले लोक करत असतील. तर त्यावर एक भन्नाट उपाय सापडला आहे. पुरणाची पोळी ही तुरीच्या डाळीपासूनही होऊ शकते.

होय, तुम्ही बरोबर ऐकलं. मऊ,लुसलुशीत पचायलाही हलकी असेल अशी पुरणाची पोळी तुरीच्या डाळीपासूनही बनवता येते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही पोळी बनवण्यासाठी फार वेळही जात नाही. कारण, तुरीची डाळ पटकन शिजते. मग यंदाच्या होळीला तुरीच्या डाळीपासून पुरणाची पोळी बनवा.

साहीत्य :

२ भांडी तूरडाळ, २ भांडी साखर, जायफळ, ५ ते ६ वेलदोड्यांची पूड २ वाट्या कणीक, अर्धी वाटी मैदा, तेल, चिमूटभर मीठ, साजूक तूप तांदुळ पिठी.

कृती :

  • तूरडाळ शिजवून घेऊन चाळणीवर निथळावी.

  • पातेलीत निथळलेली डाळ घेऊन डावाने घोटून साखर घालून शिजवावी

  • शिजवलेले पुरण वाटून जायफळ, वेलदोडे पूड घालावी.

  • कणीक व मैदा चिमूटभर मीठ व ३ डाव तेल घालून सैलसर भिजवावी.

  • २ ते ३ तास कणीक भिजल्यावर तेल पाणी लावून तिंबावी फार सैल करू नये.

  • कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याच्या दुप्पट पुरण त्यात भरावे व तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने फुलक्याच्या आकाराची जाड पराठ्याप्रमाणे पोळी लाटावी.

  • पोळी निर्लेप तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी साजूक तूप सोडून खरपूस भाजावी. अशा सर्व पोळ्या करून घ्याव्यात. वरील साहित्यात १० ते १२ मध्यम पोळ्या होतील.

टिप्स

  1. आपल्याकडे आपण हरभरा डाळीचे पुरण नेहमी पोळ्यांना करतो. पण पुष्कळ प्रांतात तूरडाळीचे पुरण करायची पद्धत आहे.

  2. हरभरा डाळीपेक्षा तूरडाळीचे पुरण पचायला सोपे. ज्यांना पथ्याने हरभरा डाळ खायची नाही त्यांना चालते.

  3. पुरण खूप कोरडे होत नाही. जरा सैलसर असते त्यामुळे पोळी खूप पातळ न लाटता जाडसर लाटतात व तुपावर भाजतात.

  4. नागपूरकडे हरभराडाळीचे वरीलप्रमाणे फक्त साखर घालून पुरण शिजवून जाडसर छोट्या पोळ्या करून तूप सोडून तव्यावर पुरणपोळ्या भाजून करायचा रिवाज आहे.

  5. साखरेच्या हरभराडाळीच्या पुरणात पुरण शिजत आल्यावर १ वाटीभर खवा घालून पुरणाला चटका द्यावा व पुरण वाटून पुरणपोळ्या कराव्या. छोट्या पुरणपोळ्या करून तव्यावर तूप सोडून भाजाव्यात. उत्कृष्ट लागतात.

(ही रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या 'हमखास पाककृती' या प्रसिद्ध पुस्तकातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT