art therapy google
लाइफस्टाइल

Art Day : चिंता, हुरहूर, अस्वस्थता.... सर्व मानसिक आजार दूर करते आर्ट थेरपी

आर्ट थेरपी केवळ प्रौढांसाठीच फायदेशीर आहे, असे नाही. तणावामुळे मुलेही कोणाला काही सांगू शकत नाहीत, असे अनेकवेळा दिसून आले आहे.

नमिता धुरी

मुंबई : पहिले म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आपल्यात तणाव, चिंता निर्माण होत आहेत. दुसरीकडे कोरोनाची वाढती प्रकरणेही चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. (how art therapy helps in mental health art for mindfulness)

जंतुसंसर्गामुळे जितके लोक आजारी पडत आहेत, तितकेच ते मानसिक आजारी होत आहेत. अशा परिस्थितीत, आर्ट थेरपी लोकांना या कठीण काळात मात करण्यासाठी खूप मदत करू शकते. हेही वाचा - What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष ?’

आर्ट थेरपी म्हणजे भावना व्यक्त करणे

कधीकधी असे होते की आपण आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना कलेतून व्यक्त करता तेव्हा त्याला आर्ट थेरपी म्हणतात. लोक त्यांच्या दडपलेल्या भावना रेखाटणे, पेंटिंग, शिल्पकला, रेखाटनाद्वारे व्यक्त करतात.

चित्रकलेतील या रंगांच्या आधारे कला चिकित्सक अशा व्यक्तीच्या मनाची स्थिती समजून घेतात. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या लोकांना तणाव वाटत आहे त्यांना आर्ट थेरपीने आराम मिळू शकतो.

कोणासाठी फायदेशीर

आर्ट थेरपी केवळ प्रौढांसाठीच फायदेशीर आहे, असे नाही. तणावामुळे मुलेही कोणाला काही सांगू शकत नाहीत, असे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत मुले रंगांचा वापर करून त्यांच्या मनःस्थितीचे वर्णन करतात.

ही आर्ट थेरपी प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी काही कारणास्तव घुसमटत आयुष्य जगत असते. मनात तणाव आणि चिंता असतात. आर्ट थेरपी हा स्वतःला व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांचे फायदे काय आहेत ते पाहूया.

तणावमुक्त होणे

तुम्ही एक कागद आणि पेन्सिल उचला आणि मनात येईल ते रेखाटा. या थेरपीसाठी तुम्ही खूप व्यावसायिक कलाकार असणे आवश्यक नाही. जेव्हा तुम्ही तणावाखाली कागदावर काहीतरी तयार करता तेव्हा तुम्हाला जाणवेल की तणाव तुमच्या आतून हळूहळू बाहेर पडत आहे.

गेल्या काही वर्षांतील काही संशोधने असेही सूचित करतात की तणाव आणि नैराश्याच्या बाबतीत आर्ट थेरपी हा एक चांगला पर्याय आहे.

चांगले मानसिक आरोग्य

जेव्हा तुम्ही कागदावर एखादी गोष्ट काढता तेव्हा त्यात तुमच्या आवडीचे रंग भरता, त्यामुळे तुमचे अंतर्मन आनंदी होते. स्केचिंगमुळे तुमची मानसिक क्षमता वाढते. तुमच्या आत जे काही गोंधळले आहे, ते तुम्ही त्या पेपरमध्ये व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमची उत्पादकताही वाढते.

तुम्ही व्यग्र असाल

आता जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतलेले नसता तेव्हा नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यातून जात नाहीत. जेव्हा तुम्ही अनावश्यक अफवा आणि नकारात्मकतेकडे लक्ष देता तेव्हाच काळजी वाढते.

पण जेव्हा तुम्ही एखाद्या कामात व्यग्र असता तेव्हा तुम्ही त्यांचा विचार करत नाही. आर्ट थेरपी दरम्यान नेमके हेच घडते. चित्रकला, स्केचिंग तुमच्या मनाला शांती देते. त्यामुळे स्वत:ला कलेमध्ये गुंतवून तुम्ही तणावातून बाहेर पडता.

एकाग्रता

कल्पना करा, तुम्ही एखादे चित्र काढत असताना तुमचे सर्व लक्ष त्या बाजूला असते. तुम्ही केंद्रित आहात. पण जेव्हा तुम्ही चिंतेने घेरलेले असता तेव्हा तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही किंवा त्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही.

त्याच वेळी, पेंटिंग, स्केचिंग, ड्रॉइंग करून तुम्ही तुमचा फोकस परत मिळवू शकता. हे तुम्हाला तुमच्यातील सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून दूर ठेवते. तुमच्यात सहिष्णुता निर्माण करते. आर्ट थेरपी तुमचं मनही भरकटू देत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT